बर्थ-डे पार्टीनंतर रस्त्यावर मिळाला एअर होस्टेसचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 03:40 PM2017-08-17T15:40:52+5:302017-08-18T00:34:19+5:30

कोलकाता विमानतळापासून जवळच असलेल्या केस्टोपूर परिसरात राहणा-या एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह येथील रस्त्यावर मिळाला.

Air-hostess body found on the road after birth-day party | बर्थ-डे पार्टीनंतर रस्त्यावर मिळाला एअर होस्टेसचा मृतदेह

बर्थ-डे पार्टीनंतर रस्त्यावर मिळाला एअर होस्टेसचा मृतदेह

कोलकाता, दि. 17 - कोलकातामध्ये इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करणा-या एका एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलकाता विमानतळापासून जवळच असलेल्या केस्टोपूर परिसरात राहणा-या एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह येथील रस्त्यावर मिळाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिने मंगळवारी रात्री तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिच्यासोबत दोन मित्र सुद्धा वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते. त्यानंतर दुस-या दिवशी खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटजवळील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर सोसायटीच्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.  
अपार्टमेंटमधील लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणा-या खोंगसित क्लारा बन्शा राय हिने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तिच्यासोबत चार जण फ्लॅटमध्ये आले होते आणि रात्री उशिरापर्यंत आवाज येत होता. दरम्यान, पोलिसांना फ्लॅटमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही दारुच्या नशेत होते. तसेच, फ्लॅटमधून दारुच्या बॉटल सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खोंगसित क्लारा बन्शा राय या अपार्टमेंटमध्ये राहायला आली होती. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोंगसित क्लारा बन्शा राय हिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. तिचा  मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. ती मूळची मेघालयातील असून इंडिगो एअरलाइन्समध्ये कामाला होती. तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. 

Web Title: Air-hostess body found on the road after birth-day party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.