तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:32 AM2018-02-11T00:32:17+5:302018-02-11T00:32:24+5:30

‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला.

Air Force Officer, who won the trust of the girl! | तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

Next

नवी दिल्ली : ‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला. सुंदर तरुणीने आपल्याविषयी शंका घ्यावी, हे अरुण मारवाह यांना रुचले नाही. त्यांचा इगोच जणू दुखावला. त्यामुळे तिचा विश्वास जिंकण्यासाठी ते हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाची माहिती तिला देत ते पाकिस्तानी आयएसआयच्या जाळ््यात अलगद अडकले.
फेसबुक चाललेले चॅटिंग महिमाच्या नावाने आयएसआय एजंट करीत होते. पोलीस आता महिमा पटेल व किरण रंधावा याही फेसबुक अकाऊंटची पडताळणी करीत आहेत. किरण रंधावा या अकाऊंटवरूनही त्यांना अनेक मेसेज आलेले आहेत. मारवाह यांनी मोबाइलमधील मेसेज डिलीट केले असले तरी पोलीस ते मिळवण्याचा प्ऱयत्नात आहेत. पोलीस खात्याकडून फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. चॅटिंगच्या विश्लेषणातून या अधिकाºयाने कोेणती माहिती आ़यएसआयला कळविली, हे कळू शकेल. ते मेसेज अधिकाºयाविरोधात पुरावा म्हणून उपयोगी ठरतील.
मारवाह यांनी एका मॉडेलला एक सीम कार्ड खरेदी करुन पाठवले होते. पोलीस या कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून माहिती मिळवत आहेत. तसेच महिमा व किरण या फेसबुक अकाऊंटसाठी ज्या मुलींचे फोटो वापरले गेले आहेत, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.

आयपी अ‍ॅड्रेस शोधणे अवघड : किरण व महिमा या नावाने लॉग इन करून, वापरलेल्या उपकरणाचा आयपी अ‍ॅड्रेस मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयएसआयने आयपी-मास्किंग किंवा प्रॉक्सी सर्व्हरचा वापर केला असल्यास आयपी अ‍ॅड्रेसपर्यंत पोहचणे हे मोठे आव्हान आहे.

Web Title: Air Force Officer, who won the trust of the girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.