आव्हाने पेलण्यास हवाई दल सज्ज, एअर चीफ मार्शल धनोआ यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:58 AM2018-06-18T03:58:31+5:302018-06-18T03:58:31+5:30

भारतीय हवाई दल देशापुढील कोणतेही आव्हान समर्थपणे पेलण्यास पूर्ण सज्ज आहे आणि अलीकडेच झालेल्या ‘गगनशक्ती’ सरावात हिच सुसज्जता पूर्ण क्षमतेने स्पष्ट झाली, अशी ग्वाहीे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी शनिवारी दिली.

Air Chief Marshal Dhanua's Guilty To Meet Challenges | आव्हाने पेलण्यास हवाई दल सज्ज, एअर चीफ मार्शल धनोआ यांची ग्वाही

आव्हाने पेलण्यास हवाई दल सज्ज, एअर चीफ मार्शल धनोआ यांची ग्वाही

Next

हैदराबाद : भारतीय हवाई दल देशापुढील कोणतेही आव्हान समर्थपणे पेलण्यास पूर्ण सज्ज आहे आणि अलीकडेच झालेल्या ‘गगनशक्ती’ सरावात हिच सुसज्जता पूर्ण क्षमतेने स्पष्ट झाली, अशी ग्वाहीे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी शनिवारी दिली.
येथून जवळच असलेल्या एअर फोर्स अकादमीमध्ये ‘कम्बाईन्ड ग्रॅज्युएशन’ परेडनंतर बोलताना एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले की, ‘गगनशक्ती’ या युद्ध सरावाची व्याप्ती भारतव्यापी होती व त्यात हवाई दलाच्या सर्व प्रकारच्या युद्ध सामुग्रीची सज्जता परखली गेली. या सरावात देशाच्या उत्तर, पश्चिम आणि पूर्व अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी सराव करण्यात आला व त्यातून कोणतेही आव्हान पेलण्यास आम्ही समर्थ आहोत हे ठामपणे दिसून आले.
हवाई दल प्रमुख म्हणाले की, दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, सीमेवरील घुसखोरी, नैसर्गिक आपत्ती यारखे कोणतेही संकट येऊ शकते. अशा वेळी सरकार जी जबाबदारी सोपवेल ती हवाईदल समर्थपणे पार पाडेल. 
>सहावी महिला ‘फायर पायलट’
कर्नाटकमधील चिकमगलूर येथील मेघना शानबाग यांची यावेळी लढाऊ विमानाच्या वैमानिक म्हणून निवड झाली. हवाई दलातील त्यासहाव्या महिला ‘फायटर पायलट’ ठरल्या. परेडनंतर १३ महिलांसह एकूण ११३ ‘फ्लार्इंग कॅडेट््स’ना हवाई दलात सामिल करून घेण्यात आले.

Web Title: Air Chief Marshal Dhanua's Guilty To Meet Challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.