आग्रा-ग्वालियर पॅसेंजर ट्रेनला अपघात, आग्रा कँटजवळ डब्बा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 12:52 PM2017-09-23T12:52:17+5:302017-09-23T13:16:44+5:30

मागच्या काही दिवसात पॅसेंजर ट्रेन घसरुन अपघात झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत.

Agra-Gwalior passenger train collapsed near accident, near Agra Cantt | आग्रा-ग्वालियर पॅसेंजर ट्रेनला अपघात, आग्रा कँटजवळ डब्बा घसरला

आग्रा-ग्वालियर पॅसेंजर ट्रेनला अपघात, आग्रा कँटजवळ डब्बा घसरला

Next

आग्रा - आग्रा कँटजवळ शनिवारी सकाळी आग्रा-ग्वालियर पॅसेंजर ट्रेनचा एक डब्बा घसरला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे. मागच्या काही दिवसात प्रवासी ट्रेनला सातत्याने अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक निरपराध नागरीकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. या सततच्या रेल्वे अपघातांमुळेच सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

मागच्या महिन्यात  उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही एक्स्प्रेस हरिद्वारच्या दिशेनं जात होती.  शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच या महिन्यात उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये रेल्वे अपघात झाला. हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरले. या अपघातात जीवितहानी झाली नाही. पण काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन अपघात, 74 प्रवासी जखमी
उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल. अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले.

 उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 
अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले होते. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाराणसीजवळ असलेल्या हरदत्तपूर रेल्वे स्टेशन परिसरात या मालगाडीचे चार डबे घसरले. या अपघातानंतर वाराणसी-अलाहाबाद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं.  या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


Web Title: Agra-Gwalior passenger train collapsed near accident, near Agra Cantt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात