भारतात आले 'अच्छे दिन'; सौदीच्या मंत्र्याकडून मोदी सरकारला शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:25 PM2018-10-15T21:25:22+5:302018-10-15T21:30:51+5:30

 "अच्छे दिन आनेवाले है" असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींवर सध्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने चौफेर टीका होत आहे.

'Achhe Din' came to India; The Saudi minister has been praised by the Modi government | भारतात आले 'अच्छे दिन'; सौदीच्या मंत्र्याकडून मोदी सरकारला शाबासकी

भारतात आले 'अच्छे दिन'; सौदीच्या मंत्र्याकडून मोदी सरकारला शाबासकी

googlenewsNext

नवी दिल्ली -  "अच्छे दिन आनेवाले है" असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींवर सध्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने चौफेर टीका होत आहे. पण सौदी अरेबियाचे उर्जा, उद्योग आणि खनिजमंत्री खलिद ए. अल फलिह यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक करताना मोदींच्या काळात भारतीय नागरिकांसाठी अच्छे दिन आल्याचा दावा केला आहे. 





फलिह म्हणाले,"मोदींच्या कार्यकाळात भारतामध्ये व्यवसाय करणे सोपे झाले आहे. तसेच परकीय गुंतवणुकही वाढली आहे. त्याबरोबरच महागाई नियंत्रणात ठेवण्यामध्येही मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला यश आले आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  तेल उत्पादक देशांचे तेलमंत्री आणि आणि तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत आज बैठक घेतली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पडता रुपया सावरण्यासाठी जागतिक तेल उत्पादकांना तेलाची रक्कम भरणा करण्याविषयीच्या अटींची समीक्षा करण्याचे आवाहन केले. 

Web Title: 'Achhe Din' came to India; The Saudi minister has been praised by the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.