आरोपी विद्यार्थीची होती प्रद्युम्नशी ओळख, मदतीच्या बहाण्याने बाथरुममध्ये नेऊन कापला गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:59 AM2017-11-13T10:59:53+5:302017-11-13T11:01:42+5:30

सीबीआयच्या नव्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यानेच प्रद्युम्नला बाथरुममध्ये नेलं होतं, आणि नंतर हत्या केली. 

Accused was friend of Pradyum | आरोपी विद्यार्थीची होती प्रद्युम्नशी ओळख, मदतीच्या बहाण्याने बाथरुममध्ये नेऊन कापला गळा

आरोपी विद्यार्थीची होती प्रद्युम्नशी ओळख, मदतीच्या बहाण्याने बाथरुममध्ये नेऊन कापला गळा

Next
ठळक मुद्देआरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होतेप्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी एकत्र पियाने क्लासमध्ये जात होतेआरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत असल्याने मदतीच्या बहाण्याने त्याला बाथरुममध्ये घेऊन गेला आणि गळा कापून हत्या केली

गुरुग्राम - रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सीबीआयने तपास सुरु केला असता चौकशीदरम्यान आरोपी विद्यार्थ्याने परिक्षेचा तणाव आणि पॅरेंट्स मीटिंग टाळण्यासाठी प्रद्युम्नची गळा कापून हत्या केल्याचं समोर आलं होतं. आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखतही नव्हता असं तपासातून समोर आल्याचं सांगण्यात आलं होतं. पण जसजसा तपास आणि चौकशीचा वेग वाढत आहे, त्यानुसार काही नवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सीबीआयच्या नव्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यानेच प्रद्युम्नला बाथरुममध्ये नेलं होतं, आणि नंतर हत्या केली. 

सीबीआयच्या थिअरीनुसार, प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी एकत्र पियाने क्लासमध्ये जात होते. यामुळेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. पण हीच ओळख प्रद्युम्नच्या जीवावर बेतली. प्रद्युम्न गेल्या दोन वर्षांपासून पियानो क्लासला जात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. शनिवारी समुपदेशनादरम्यान आरोपी विद्यार्थ्याने अल्पवयीन न्याय मंडळाला सांगितलं की, 8 सप्टेंबरच्या सकाळी शाळेत पोहोचल्यानंतर आपलं दप्तर वर्गात ठेवलं आणि बाजारातून खरेदी केलेला चाकू घेऊन तळमजल्यावर गेलो. प्रद्युम्नचा गळा कापल्यानंतर त्याने रक्ताची उलटी केली आणि चाकूवरच पडला. ज्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. 

आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत असल्याने मदतीच्या बहाण्याने त्याला बाथरुममध्ये घेऊन गेला आणि गळा कापून हत्या केली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याने सांगितलं की, प्रद्युम्नच्या पाठीवर दप्तर असल्याचा फायदा त्याला मिळाला. दप्तरामुळे रक्ताचे कोणतेही डाग त्याच्या कपड्यावर पडले नाहीत. यानंतर त्याने चाकू तिथेच ठेवला आणि बाहेर पळत जाऊन माळी आणि शिक्षकांना माहिती दिली. याशिवाय, आरोपीने हेदेखील कबूल केलं आहे की, आपल्याला परिक्षेची भीती वाटत होती आणि कोणत्याही परिस्थितीत ती टाळायची होती. 

तीन दिवसांची रिमांड संपल्यानंतर शनिवारी सीबीआयने आरोपी विद्यार्थ्याला अल्पवयीन न्याय मॅजिस्ट्रेट देवेंद्र सिंह यांच्यासमोर हजर केलं. यावेळी रिमांड वाढवण्याची कोणतीही मागणी करण्यात न आल्याने आरोपी विद्यार्थ्याला 22 नोव्हेंबरपर्यंत फरीदाबाद सुधारगृहात पाठवण्यात आलं. 

सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये आऱोपीने आपला  गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घरात रोज आई-वडिलांच्या भांडणामुळे वातावरण बिघडलं होतं आणि त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता असं आरोपी विद्यार्थ्याचं म्हणणं आहे'. 
 

Web Title: Accused was friend of Pradyum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.