90% of Narendra Modi's people do not know the people, Shatrughan Sinha's attack | नरेंद्र मोदींच्या 90 टक्के मंत्र्यांना देशातील जनता ओळखत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा हल्लाबोल

ठळक मुद्देमंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाहीनरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर टीकेची झोड

नवी दिली : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका नरेंद्र मोदी सरकारवर गुरुवारी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर निशाणा साधला. दरम्यान, याआधी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला होता.
गुरुवारी एका कार्यक्रानंतर पत्रकारांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के लोकांना देशातील जनता ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के लोकांबद्दल जनतेला आदर वाटत नाही. मोदींचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या कामाबद्दल जनतेला कोणतीही माहिती नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के चेहरे जनतेसाठी अनोळखी आहेत. तर बाकीच्या 10 टक्के मंत्र्यांनी जनतेच्या मनात असलेला आदर गमावलेला आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, काल शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून पद्मावती वादावर मौन बाळगल्याप्रकरणी नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पद्मावती सध्या ज्वलंत मुद्दा आहे. या मुद्यावर महान अभिनेते अमिताभ बच्चन, अष्टपैलू आमीर खान आणि प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांन काहीच वक्तव्य कसे केले नाही असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. याचबरोबर, आपले माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सर्वात लोकप्रिय पंतप्रधान (पीईडब्ल्यूनुसार) नरेंद्र मोदींनी मौन का बाळगले आहे', असा सवाल शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.