उत्तर प्रदेशात भीषण अपघात; बसनं ट्रकला दिलेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:14 AM2019-03-29T10:14:55+5:302019-03-29T10:16:32+5:30

अपघातात 30 जण जखमी; काहींची प्रकृती चिंताजनक

8 Dead And 30 Injured After Bus Rammed Into A Truck On Yamuna Expressway In Greater Noida | उत्तर प्रदेशात भीषण अपघात; बसनं ट्रकला दिलेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; बसनं ट्रकला दिलेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

Next

ग्रेटर नोएडा: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर बसनं ट्रकला धडक दिली. रबूपुरा भागात झालेल्या या अपघातात 30 जण जखमी झाले. त्यांच्यावर जेवरमधील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. 




आग्र्याहून यमुना एक्स्प्रेस वेवरुन ग्रेटर नोएडाच्या दिशेनं येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला होता. या बसनं समोरच्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बस ओरेया आगाराची आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी याबद्दल ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. 

Web Title: 8 Dead And 30 Injured After Bus Rammed Into A Truck On Yamuna Expressway In Greater Noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.