हुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 09:40 AM2018-11-17T09:40:56+5:302018-11-17T10:52:51+5:30

हुबळीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

6 people killed and more than 10 injured in a collision between a bus and a lorry near Hubli on National Highway 63 | हुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

हुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Next
ठळक मुद्देकर्नाटकातील हुबळीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

हुबळी - कर्नाटकातील हुबळीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईतील असून ते खासगी बसनं कर्नाटकला जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (17 नोव्हेंबर) पहाटे हा अपघात झाला. मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


 

Web Title: 6 people killed and more than 10 injured in a collision between a bus and a lorry near Hubli on National Highway 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.