भय इथले संपत नाही!; इंदूरमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 12:07 PM2018-04-21T12:07:09+5:302018-04-21T12:07:09+5:30

आरोपी सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून शोध सुरू

6 month old girl raped killed in Indore basement | भय इथले संपत नाही!; इंदूरमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

भय इथले संपत नाही!; इंदूरमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

googlenewsNext

इंदूर: कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना इंदूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इंदूरमध्ये एका सहा महिन्यांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यानंतर मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. वृत्तसंस्था पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे. 

मुलीचा मृतदेह सापडल्यावर एम वाय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. या मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली. या मुलीचं अपहरण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव सुनील भील असल्याचं समजतंय. सहा महिन्यांच्या चिमुरडीला खांद्यावरुन घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला. 'राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. राजवाडा किल्ला परिसरातून सुनीलनं लहान मुलीचं सकाळी अपहरण केलं होतं. यावेळी ती मुलगी तिच्या पालकांसोबत झोपली होती,' अशी माहिती इंदूरचे उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी सांगितलं. सुनील भील हा मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता, अशीही माहिती त्यांनी दिली. 

'पहाटे 4.45 च्या सुमारास सुनीलनं मुलीचं अपहरण केलं. यावेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला. यानंतर तो तिला 50 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी मुलीचा मृतदेह आढळून आला,' असेही मिश्रा यांनी सांगितलं. चिमुरडीवर बलात्कार केल्यावर सुनीलनं तिला जमिनीवर टाकून दिलं. त्यामुळे तिच्या डोक्याला इजा झाली. या प्रकरणातील आरोपी सुनील भील अद्याप फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. 
 

Web Title: 6 month old girl raped killed in Indore basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.