सीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:55 AM2018-05-28T01:55:09+5:302018-05-28T01:55:09+5:30

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन करण्यात येणाऱ्या गोळीबार व तोफगोळ््यांच्या मा-यामुळे सीमेलगत भारतीय हद्दीतल्या गावांतील लोकांचे मुश्किल झाले आहे.

5,500 bunkers to be built in the seamless, the major relief to the citizens | सीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा

सीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा

Next

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन करण्यात येणाऱ्या गोळीबार व तोफगोळ््यांच्या मा-यामुळे सीमेलगत भारतीय हद्दीतल्या गावांतील लोकांचे मुश्किल झाले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत साडेपाच हजार बंकर तसेच २०० कम्युनिटी हॉल तसेच बॉर्डर भवन बांधण्यात येणार आहेत.
हे बंकर व कम्युनिटी हॉल बांधण्यासाठी १५३.६० कोटी रुपये खर्च येणार असून या योजनेला केंद्रीय गृह खाते व जम्मू-काश्मीर सरकारने याआधीच मंजुरी दिली आहे. या कामाच्या पूर्वतयारीसाठी राजौरी जिल्हा विकास आयुक्त शाहिद इक्बाल यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. फॅमिली बंकर, कम्युनिटी बंकर असे विविध प्रकारचे बंकर बांधण्यात येणार आहेत.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या १२० किमी भागामध्ये सुंदरबनी, किला द्रहाल, नौशेरा, डुंगी, राजौरी, पंजग्रेन, मानाजाकोटे या सात विभागांत ५१९६ बंकर बांधण्यात येतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तूीन किमी अंतरापर्यंतच्या पट्ट्यातील गावांमध्ये २६० कम्युनिटी बंकर व १६० कम्युनिटी हॉल बांधण्यात येणार आहेत. पाकिस्तानकडून गोळीबार किंवा तोफगोळ््यांचा मारा सुरु झाल्यानंतर गावकºयांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली तर हे बंकर व कम्युनिटी हॉल खूप उपयोगी ठरतील.
हे बंकर व कम्युनिटी हॉल गावातील शाळा, रुग्णालये, पोलिस चौकी, सरकारी इमारती, पंचायत कार्यालय यांच्या जवळ बांधण्यात येणार आहेत. शांततेच्या काळात या वास्तूंचा सार्वजनिक उपक्रमांसाठी उपयोग व्हावा याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. ही बांधकामे करण्यासाठी लागणारी जमिन उपलब्ध करुन द्यावी असा आदेश देण्यात आला आहे.

Web Title: 5,500 bunkers to be built in the seamless, the major relief to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.