स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या मुलाची सुटका, गोळीबारात एक अपहरणकर्ता ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:45 AM2018-02-06T07:45:55+5:302018-02-06T08:39:55+5:30

मागच्या महिन्यात स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाचवर्षाच्या मुलाची दिल्ली पोलिसांनी सुटका केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मुलाचे अपहरण करण्यात आले होते

5 year old Abducted Boy Rescued After Shootout; 1 Kidnapper Killed, 2 Injured | स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या मुलाची सुटका, गोळीबारात एक अपहरणकर्ता ठार, दोघे जखमी

स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या मुलाची सुटका, गोळीबारात एक अपहरणकर्ता ठार, दोघे जखमी

Next
ठळक मुद्देदिल्लीच्या श्रेष्ठाविहार परिसरातून 25 जानेवारीला दुचाकीवरुन आलेल्या दोघा आरोपींनी या मुलाचे अपहरण केले होते.आरोपी मुलाला घेऊन दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते.

गाझियाबाद - मागच्या महिन्यात स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाचवर्षाच्या मुलाची दिल्ली पोलिसांनी सुटका केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा या मुलाची सुटका केली. आरोपींच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यावेळी एका अपहरणकर्ता ठार झाला तर दोघे जखमी झाले. 

 चकमकीत एक पोलिसही जखमी झाला. गोळीबारात जो अपहरणकर्ता ठार झाले त्याचे नाव रवी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवीला जीटीबी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.   



 

दिल्लीच्या श्रेष्ठाविहार परिसरातून 25 जानेवारीला दुचाकीवरुन आलेल्या दोघा आरोपींनी या मुलाचे अपहरण केले होते. सकाळी आठच्या सुमारास आरोपींनी बाईक आडवी घालून विवेकानंद शाळेची स्कूल बस थांबवली. ड्रायव्हरवर गोळीबार केला व मुलाचे अपहरण केले. आरोपी मुलाला घेऊन दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. गोळीबारात जखमी झालेल्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.                                   



 

Web Title: 5 year old Abducted Boy Rescued After Shootout; 1 Kidnapper Killed, 2 Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.