हिमाचल प्रदेशमध्ये ४७९ अर्ज दाखल, काँग्रेस-भाजपामध्ये प्रचंड चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:23 AM2017-10-25T04:23:06+5:302017-10-25T04:23:16+5:30

सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. ६८ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

479 nominations filed in Himachal Pradesh; | हिमाचल प्रदेशमध्ये ४७९ अर्ज दाखल, काँग्रेस-भाजपामध्ये प्रचंड चुरस

हिमाचल प्रदेशमध्ये ४७९ अर्ज दाखल, काँग्रेस-भाजपामध्ये प्रचंड चुरस

googlenewsNext

सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. ६८ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या अर्जांची छाननी २४ आॅक्टोबर रोजी, तर अर्ज मागे घ्यायची मुदत २६ आॅक्टोबर आहे. अर्ज करण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. हे राज्य टिकविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, तर त्यावर कब्जा करण्यासाठी भाजपाने सारी ताकद लावली आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस होईल, असे दिसते.
मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते प्रेमकुमार धुमल यांच्यासह २७५ जणांनी अर्ज दाखल केले. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार कांगरातील १५ जागांसाठी ११९, मंडीतील दहा जागांसाठी ७४, शिमल्यातील ८ जागांसाठी ६४ हमीरपूरमधील पाच जागांसाठी ४१, चांबातील पाच जागांसाठी २८ व सोलनमधील ५ जागांसाठी २९ अर्ज दाखल झाले आहेत.
सिरमाऊरतील पाच जागांसाठी २७, उनातील पाच जागांसाठी ४७, बिलासपूरमधील चार जागांसाठी १७ कुल्लूतील चार जागांसाठी २३, लाहौल, किन्नोर आणि स्पितीतील प्रत्येकी एका जागेसाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे नेते दीपक राठोर यांनी सोमवारी थिओग मतदारसंघातून अर्ज भरला, परंतु पक्षाने नंतर या मतदारसंघातून विद्यमान पाटबंधारे खात्याच्या मंत्री विद्या स्टोक्स (८९) या अधिकृत उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. स्टोक्स यांनी नंतर थिओगमधून (जिल्हा सिमला) अर्ज भरला.
स्टोक्स यांनी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी आपली जागा द्यायची तयारी दाखविली होती, परंतु सिंग यांनाच तेथून हलवून अर्की (जिल्हा सिमला-ग्रामीण) मतदारसंघ दिला गेला आहे. सिंग यांच्या मुलाला पारंपरिक सिमला (ग्रामीण) मतदारसंघ सोडण्यात आला आहे.
>पक्षश्रेष्ठींनीच दिली उमेदवारी
ही निवडणूक लढविण्यास पक्ष श्रेष्ठींनी स्टोक्स यांना सांगितले होते, असे हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुखविंदर सिंग सुख्खू यांनी सांगितले.विद्या स्टोक्स यांनी विधानसभा निवडणूक १९७४ पासून दहा वेळा लढवलेली आहे. त्यांचा १९७७ व १९९३ मध्ये पराभव झाला होता.

Web Title: 479 nominations filed in Himachal Pradesh;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.