तिने साडी नेसलेली असतानाही 42 किमी मॅरेथॉन केली पूर्ण, गिनीजमध्ये होणार नोंद

By शिवराज यादव | Published: August 22, 2017 02:11 PM2017-08-22T14:11:58+5:302017-08-22T14:28:06+5:30

संपुर्ण मॅरेथॉन पार पडेपर्यंत सर्वाचं लक्ष फक्त तिच्याकडेच लागलं होतं

44 Year old woman completes 42km Marathon in sari | तिने साडी नेसलेली असतानाही 42 किमी मॅरेथॉन केली पूर्ण, गिनीजमध्ये होणार नोंद

तिने साडी नेसलेली असतानाही 42 किमी मॅरेथॉन केली पूर्ण, गिनीजमध्ये होणार नोंद

Next

हैदराबाद, दि. 22 - मॅरेथॉनमध्ये धावायचं म्हटलं की अनेकजण आधापासूनच तयारी करत असतात. त्यात मॅरेथॉनमध्ये धावायचं म्हणजे शॉर्ट, टी-शर्ट, शूज सगळं कसं व्यवस्थित असावं लागतं. पण एखाद्या तरुणी किंवा महिलेला साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावायला सांगितलं, तर....ती सर्वात आधी तुम्हाला वेड्यात काढेल. पण हैदराबादमध्ये एका महिलेने हा कारनामा करुन दाखवला आहे. ही महिला फक्त साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली नाही, तर 42 किमी अंतर पुर्णही केलं. जयंती संपत कुमार असं या महिलेचं नाव आहे. संपुर्ण मॅरेथॉन पार पडेपर्यंत सर्वाचं लक्ष फक्त तिच्याकडेच लागलं होतं. 

हैदराबादमध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये जवळपास 20 हजार लोक सहभागी झाले होते. जयंती संपत कुमारही त्यांच्यातील एक होती. जयंती अत्यंत पारंपारिक पद्धतीत साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी आली होती. अनेकांना तिला पाहून आश्चर्य वाटत होतं. यामागंच नेमक कारण जयंतीने मॅरेथॉन पुर्ण केल्यावर सांगितलं. हातमाग वस्त्रांचं प्रमोशन करण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो असल्याचं तिने सांगितलं. जयंतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही अर्ज केला आहे. 

'हा एक मस्त अनुभव होता. अनेकांना माझ्याकडे पाहून कुतुहूल वाटत होतं. त्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायची होती', असं जयंतीने सांगितलं आहे. साडी नेसून धावण्यामागचं कारण विचारलं असता तिने सांगितलं की, 'वस्त्रांचं प्रमोशन करण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्धेश होता. मी एक सायकलिस्ट असून अनेकदा फिरायला जात असते. यावेळी रस्त्यावर साचणारं प्लास्टिक पाहून प्रदूषण किती वाढलं आहे याची कल्पना येते. ही संधी साधत मला त्याचाही निषेध करायचा आहे. त्यासाठी कदाचित मी प्लास्टिकने बनवलेली साडी नेसून धावायला हवं'. 

जयंची यांनी पायातही शूज न घालता सँडल घातल्या होत्या. याबद्दल विचारलं असता तिने सांगितलं की, 'मला उघड्या पायांनी धावायचं होतं, ज्यामुळे मला वेग मिळाला असता. पण दगडं पायाला लागून जखम होईल म्हणून मी सँडल घालायचं ठरवलं'.

साडी नेसलेली असतानाही इतक्या कमी वेळात मॅरेथॉन पुर्ण केल्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही जयंतीने अर्ज केला आहे. 'मी त्यांना याबद्दल माहिती दिली होती. मला जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते पुरावा म्हणून त्यांना पाठवण्यात येईल. याशिवाय माझ्यासोबत असलेल्या प्रशिक्षकांनी व्हिडीओ काढला आहे. पाच तासात मॅरेथॉन पुर्ण करायची होती, जे आव्हान मी पुर्ण केलं आहे', असं जयंतीने सांगितलं आहे. 

Web Title: 44 Year old woman completes 42km Marathon in sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.