पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:20 AM2018-05-25T11:20:22+5:302018-05-25T11:20:22+5:30

चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत.

4 years of modi governmentnarendra modis wealth up 42 known cabinet minister wealth up | पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या 2जी, कोळसा घोटाळ्यांसारख्या मुद्द्यांवरून रान उठवत मोदी सरकार अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आले. जनतेनं मोदींना भारताचे पंतप्रधान बनण्याचीही संधी दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा चार वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार असल्याचंही मोदींच्या मंत्रिमंडळातील नेते नेहमीच दावा करत असतात. परंतु खरंच मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार राहिलं आहे का, मोदींच्या मंत्रिमंडळातील कोट्यधीश मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती पाहून तुमचे डोळे विस्फारतील. लोकसभा निवडणूक 2014नंतर मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उघडकीस आलं आहे. 

नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म 2016च्या एका रिपोर्टनुसार, मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 2014 पासून 2017पर्यंत जवळपास 41.8 टक्के(1.41 कोटी ते 2 कोटी रुपये) वाढ झाली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के(4.65 कोटी रुपयांहून 6.62 कोटी रुपये) वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वृद्धी झाल्याचं समोर आलं आहे. 2015-17दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के(2014-15मध्ये 53 लाखांहून अधिक संपत्ती वाढून 2016-17मध्ये 89 लाख )वाढ झाली. तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचं उघड झालंय. जावडेकर यांची संपत्ती 50 टक्क्यां(1.11कोटी रुपयांवरून 56 लाख रुपयां)वर आली आहे. 

केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांच्या संपत्तीत 23.5 टक्के(7.97 कोटी रुपयांवरून 9.85 कोटी रुपये) वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उत्पन्नातही 17.4 टक्के(4.55 कोटी रुपयांवरून 5.34 कोटी रुपये) वाढ झाली. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंय यांच्या उत्पन्नात 12.5 टक्के(69 लाखांहून 78 लाख रुपये) नोंदवण्यात आली आहे. मोदी सरकारमधल्या 5 मंत्र्यांजवळ स्वतःच्या पती/पत्नीच्या तुलनेत फारच कमी संपत्ती आहे. या मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, रामविलास पासवान, मुख्यात अब्बास नक्वी आणि बीरेंद्र सिंह चौधरी यांचा समावेश आहे. 

Web Title: 4 years of modi governmentnarendra modis wealth up 42 known cabinet minister wealth up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.