अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:33 PM2018-11-14T13:33:58+5:302018-11-14T13:35:27+5:30

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला

352 Year Old Alive And Use To Vote In Andhra Pradesh | अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

googlenewsNext

विजयवाडा: महाभारतातल्या अश्वत्थामाबद्दल तुम्ही नक्कीच वाचलं किंवा ऐकलं असेल. अश्वत्थामा आजही जिवंत आहे, तो त्याच्या भळभळत्या जखमांसह डोंगर दऱ्यातून भटकतो, असं म्हटलं जातं. यात काही तथ्य असण्याची शक्यता नाही. मात्र आंध्र प्रदेशात एक 352 वर्षांची व्यक्ती राहते. विशेष म्हणजे ही व्यक्ती प्रत्येक निवडणुकीत न चुकीत मतदानही करते. एखादी व्यक्ती तब्बल 352 वर्षे कशी काय जगू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं गुपित मतदारयाद्यांमधल्या गोंधळात दडलं आहे.

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला. त्यातून अनेक गोंधळ समोर आले आहेत. जिल्ह्यात एक 352 वर्षाची व्यक्ती राहत असून ती दरवर्षी मतदान करते, अशी अजब माहिती मतदारयाद्यांमधील गोंधळातून पुढे आली आहे. यासोबतच असे अनेक गोंधळात टाकणारे आकडे अभ्यासातून समोर आले आहेत. आयआयएम बंगळुरुचा माजी विद्यार्थी आणि सॉफ्टवेअर अभियंता थुम्माला लोकेश्वर रेड्डीच्या टीमनं ही भंडावून सोडणारी माहिती शोधून काढली आहे. 

मतदारयाद्यांमधील 15 टक्के मतदार बोगस आणि अवैध असल्याची माहिती रेड्डी आणि त्यांच्या टीमनं पुढे आणली आहे. मतदारयादीत अनेकांची नावं वारंवार आली आहेत. हे बोगस मतदार एखाद्या मतदारसंघाचा निकाल फिरवू शकतात. आंध्र प्रदेशातील मतदारांची संख्या 3.2 कोटी इतकी आहे. यातील 52.57 लाख मतदार बोगस असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. तर 25 लाख मतदारांची नावं योग्य असली, तरी मतदारयादीतील त्यांची इतर माहिती चुकीची आहे. दोन-दोन मतदार ओळखपत्रं बाळगणाऱ्या लोकांची संख्यादेखील हजारोंच्या घरात आहे. 
 

Web Title: 352 Year Old Alive And Use To Vote In Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.