केनियातील 3 भारतीय आणि 7 नेपाळी तरूणींची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:17 PM2018-01-04T19:17:16+5:302018-01-04T19:31:00+5:30

केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.

3 Indian and 7 Nepali youths rescued from Kenya, Sushma Swaraj's information | केनियातील 3 भारतीय आणि 7 नेपाळी तरूणींची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

केनियातील 3 भारतीय आणि 7 नेपाळी तरूणींची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.
सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये अडकलेल्या 3 भारतीय तरूणींची सुटका केली आहे. 3 भारतीय तरूणींसह 7 नेपाळी तरुणींची देखील सुटका करण्यात आली आहे. मानवी तस्करीत अडकलेल्या या तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना केनियाहून परत आणण्यात आले आहे. केनियातील मोम्बासा येथे कैद असलेल्या या तरुणींचे पासपोर्ट आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.




याचबरोबर, मंत्रालयाने याबाबतची माहिती पंजाब सरकारला दिली आहे. त्यानुसार, याप्रकरणात सामील असलेल्या  दलाल आणि संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तरूणींची सुटकेसाठी प्रयत्न केल्याबद्दल स्वराज यांनी केनियामधील भारतीय उच्चायुक्त सुचित्रा दुराई आणि सचिव करण यादव यांचे आभार मानले. तसेच, या तुरुणींची सुटका करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी केनियातील पोलिसांचे विशेष आभार सुषमा स्वराज यांनी मानले आहेत. 



 

Web Title: 3 Indian and 7 Nepali youths rescued from Kenya, Sushma Swaraj's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.