गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:13 AM2017-11-30T06:13:59+5:302017-11-30T06:14:13+5:30

गुजरातमध्ये ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नेमक्या याच काळात मुहूर्त असून, त्यात २५ हजारांहून अधिक विवाह पार पडणार आहेत.

 25,000 marriages in the fortnight of Gujarat | गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह

गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह

Next

- महेश खरे
सूरत : गुजरातमध्ये ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नेमक्या याच काळात मुहूर्त असून, त्यात २५ हजारांहून अधिक विवाह पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवार धास्तावले आहेत.
एका विवाह समारंभात १०० कुटुंबे सहभागी होणार असल्याचा अंदाज बघता प्रति कुटुंबातील तीन व्यक्ती याप्रमाणे ३० ते ३५ लाख लोक लग्नात व्यग्र असतील आणि प्रचार व मतदानात ते भाग घेणार नाहीत, अशी शक्यता आहे.
याच मूहुर्तावर राजस्थानात विवाह समारंभासाठी गुजरातमधील अनेक कुटुंबे जाणार आहेत. जयपूर, उदयपूर, पाली, शेखावाटी, बिकानेर आणि अजमेरसह राजस्थानमधील ५० शहरे आणि गावांत होणाºया लग्न समारंभासाठी गुजरातमधून वºहाडी मंडळी जाणार आहे. तिथे जाणाºया सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. लगीन घाईमुळे प्रचारांसाठी तरुणांची फौैज मिळत नसल्याने उमेदवार आता लग्नघरी भेट देऊन प्रचार करीत आहेत. पण मतदानाच्या दिवशी काय? हा प्रश्न भेडसावत आहे. मतदान केंद्रावर सहजगत्या कार्यकर्ते मिळणार नाहीत.
सूरतमध्ये वस्ती व गल्लीत लग्नसमारंभाची धुमधडाक्याने तयारी सुरू आहे. बस आणि बँडबाजा मिळणेही कठीण आहे. गुजराती समुदायात लग्नसोहळा दिवसा आयोजित करण्याची प्रथा आहे. अनेक महिन्यापासून येथील हॉटेल, लॉजेस बुक झाल्या आहेत.

Web Title:  25,000 marriages in the fortnight of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.