गरिबांच्या घरांकरिता राज्याला २,0९६ कोटी; ठाणे, सोलापुरात सर्वाधिक घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:47 AM2018-02-11T05:47:32+5:302018-02-11T06:00:41+5:30

पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध्येच सर्वाधिक घरे बांधण्यात येणार आहेत.

2,096 crores for the poor houses; Most homes in Thane, Solapur | गरिबांच्या घरांकरिता राज्याला २,0९६ कोटी; ठाणे, सोलापुरात सर्वाधिक घरे

गरिबांच्या घरांकरिता राज्याला २,0९६ कोटी; ठाणे, सोलापुरात सर्वाधिक घरे

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध्येच सर्वाधिक घरे बांधण्यात येणार आहेत.
मात्र, राज्यात या योजनेखाली किती घरे बांधण्याची गरज आहे, ही माहिती केंद्राने महाराष्ट्र सरकारकडून मागविली असून, वरील सर्व योजना मान्य केल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याने ही माहिती देताना सांगितले की, शहरी गरिबांच्या घरांच्या मागणीनुसार हे साह्य दिले जाते. त्यात प्रत्येक राज्याचा वा केंद्रशासित प्रदेशाचा कोटा ठरविण्यात आलेला नाही. राज्यसभेत राजकुमार धूत (शिवसेना) यांनी राज्याचा घरांसाठीचा कोटा वाढविणार का, असे विचारले होते. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप पुरी म्हणाले की, घरांची गरज हा या योजनेचा निकष असून, त्यात राज्याच्या कोट्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे व अमरावती या शहरांतील गरिबांची घरांसाठीची मागणी अधिक असल्याने, तिथे अधिक सदनिका बांधण्यात येतील.

जिल्हावार घरे
नगर
1496
अमरावती
8532
औरंगाबाद
1760
बुलडाणा
833
चंद्रपूर
264
धुळे
858
गडचिरोली
1264
जालना
364
कोल्हापूर
565
लातूर
1632
नागपूर
8447
नंदूरबार
176
नाशिक
626
पालघर
8611
परभणी
500
पुणे
7494
रायगड
5981
सांगली
130
सातारा
112
सोलापूर
34377
ठाणे
55055
वाशिम
386
वर्धा
834

Web Title: 2,096 crores for the poor houses; Most homes in Thane, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.