धक्कादायक! 11 वर्षात 20,500 जणांना रक्ताच्या संक्रमणातून HIV ची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 10:50 AM2018-02-08T10:50:43+5:302018-02-08T10:55:12+5:30

एकच इंजेक्शन अनेकांसाठी वापरल्यामुळे 20 जणांचा एचआयव्हीची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एचआयव्हीसंबंधी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे.

20,500 got HIV through blood transfusion in 11 years | धक्कादायक! 11 वर्षात 20,500 जणांना रक्ताच्या संक्रमणातून HIV ची लागण

धक्कादायक! 11 वर्षात 20,500 जणांना रक्ताच्या संक्रमणातून HIV ची लागण

Next
ठळक मुद्देगुजरातमध्ये पाचपैकी एका रुग्णाला रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1,134 जणांना रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात बोगस डॉक्टरने एकच इंजेक्शन अनेकांसाठी वापरल्यामुळे 20 जणांचा एचआयव्हीची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एचआयव्हीसंबंधी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2007 पासून आतापर्यंत रक्ताच्या संक्रमणासतून 20,592 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. राष्ट्रीय एडस नियंत्रण संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. 

गुजरातमध्ये पाचपैकी एका रुग्णाला रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1,134 जणांना रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेच्या आयसीटीसी सेंटर्सशी संबंधित असलेल्या रुग्णांनी दिलेल्या माहितीतून हा डाटा तयार करण्यात आला आहे. सर्वांनाच रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची लागण झालीय असे म्हणता येणार नाही अनेकदा आपली चूक लपवण्यासाठी रुग्ण रक्त संक्रमणाचे कारण देतात असे तज्ञांनी सांगितले. 

रक्तपेढीकडे चौथ्या पिढीचा एलिसा टेस्टिंग किट नसेल तर रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही होण्याची शक्यता असते असे डॉक्टरांनी सांगितले. सरकारी केंद्रामध्ये तिस-या पिढीचे किट वापरले जातात. ज्यामध्ये आठ ते 12 आठवडयांनी एचआयव्हीचे इंफेक्शन ओळखण्याची क्षमता असते. चौथ्या पिढीचे एलिसा किट चौथ्या आठवडयातच एचआयव्हीचे इंफेक्शन ओळखू शकतात. रक्तदान शिबिरामध्ये काहीवेळा एचआयव्ही बाधितही रक्तदान करतात. आपल्याला हा आजार आहे याची त्यांना माहितीही नसते. 

काय घडले उत्तर प्रदेशात 
उत्तर प्रदेशात उन्नावमध्ये एका डॉक्टरने जास्त पैसे कमवायचा नादात 20 जणांचा जीव धोक्यात टाकला आहे. बांगरमऊ तहसीलमध्ये एका बोगस डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून सायकलीवर फिरून लोकांवर उपचार करतो आहे. धक्कादायक म्हणजे हा झोलर डॉक्टर प्रत्येक रूग्णासाठी एकाच इजेंक्शनचा वापर करतो. बोगस डॉक्टरच्या या प्रतापामुळे तेथील 20 लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. 
 

Web Title: 20,500 got HIV through blood transfusion in 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य