छत्तीसगडच्या गोशाळेत २00 गार्इंचा मृत्यू?  उपासमारीमुळे  गाई मेल्याचा स्थानिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:49 PM2017-08-19T23:49:25+5:302017-08-19T23:49:46+5:30

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे.

200 Chhattisgarh Goshala deaths? The accusations of the locals of the cow was killed due to starvation | छत्तीसगडच्या गोशाळेत २00 गार्इंचा मृत्यू?  उपासमारीमुळे  गाई मेल्याचा स्थानिकांचा आरोप

छत्तीसगडच्या गोशाळेत २00 गार्इंचा मृत्यू?  उपासमारीमुळे  गाई मेल्याचा स्थानिकांचा आरोप

Next

दुर्ग :  छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. त्या गोशाळेत २७ गायींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी गावकºयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही काळात तिथे २00 हून अधिक गायी मरण पावल्या आहेत.
 छत्तीसगडमधील गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. गोशाळेची भिंत कोसळून २७ गायींचा मृत्यू झाला, असा दावा संचालक हरीश वर्मा याने केला आहे. तो जामुल नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे. गावकºयांनी आरोप केला की, 
तिथे रात्री जेसीबी मशिन आणल्या जात होत्या आणि जवळच खड्डे खणून त्यात अनेक गायी पुरण्यात आल्या आहेत. 
 गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत प्रचंड अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईही पसरली होती. दुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणाºया राजपूर 
गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत २७ गायींचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशुवैद्यांचे पथक चौकशीसाठी राजपूरला पाठवण्यात आले. उपविभागीय दंडाधिकाºयांनीही घटनास्थळाचा दौरा केला. पूर्ण चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. 
 संचालक हरीश वर्माने सांगितले की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील 
९0 फूट लांब भिंत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झाल्याने २७ गायींचा तीन दिवसांत मृत्यू झाला. जखमी गायींवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)

उपासमारीने मृत्यू : काँग्रेस
काँग्रेसने गायींचे मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी देण्यात न आल्यानेच गायींचा मृत्यू झाला आहे. या गोशाळेत प्रचंड अस्वच्छता आहे, ज्यामुळे आतापर्यंत या गोशाळेमध्ये सुमारे ३00 गायी मरण पावल्या आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: 200 Chhattisgarh Goshala deaths? The accusations of the locals of the cow was killed due to starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.