2 IS terrorists arrested from Red Fort, delhi | लाल किल्ल्याजवळून आयएसच्या 2 दहशतवाद्यांना अटक
लाल किल्ल्याजवळून आयएसच्या 2 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काल रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. जामा मशीदीजवळच्या बस थांब्यावर थांबले असताना ताब्यात घेतले. 


या दहशतवाद्यांचे नाव परवेज आणि जमशेद असे असून ते इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. या दोघांकडे दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली होती. तसेच दोघेही दिल्लीहून काश्मिरला जाणार होते. 


सुत्रांनुसार हे दोघेही काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. जानेवारीमध्ये एका चकमकीत परवेजचा दहशतवादी भाऊ मारला गेला होता. परवेज हा आधी हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधीत होता नंतर तो आयएसजेकेमध्ये गेला. 


या दोघांचाही दिल्लीमध्ये दहशवादी कारवाया करण्याचा हेतू नव्हता. त्यांनी चौकशीमध्ये आयएसजेकेचा प्रमुख उमर नजीर आणि उपप्रमुख आदिल थोकर असल्याचे सांगितले. ते थोकरच्या आदेशानुसार दिल्लीला आले होते. त्यांना सध्या 5 दिवसांची पोलीस कोठडीत पाठविले आहे.

English summary:
Delhi Police arrested two ISIS terrorist near Lal Fort last night. When the bus was stopped at the bus stop near the Jama Masjid, they were taken into custody.


Web Title: 2 IS terrorists arrested from Red Fort, delhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.