अण्णाद्रमुकचे 'ते'18 आमदार अपात्रच; मद्रास उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:59 AM2018-10-25T10:59:20+5:302018-10-25T11:00:26+5:30

सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. 12 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी 31 ऑगस्टला यावरील निकाल राखून ठेवला होता.

18 MLAs of 'AIADMK' disqualified; Madras High Court upholds Tamil Nadu speaker's decision | अण्णाद्रमुकचे 'ते'18 आमदार अपात्रच; मद्रास उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

अण्णाद्रमुकचे 'ते'18 आमदार अपात्रच; मद्रास उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Next

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या 18 विधानसभा आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया विरोधातील आव्हान याचिकेवर आज मद्रास उच्च न्यायालयाकडून निकाल दिला असूव तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवल्याने अण्णाद्रमुकला मोठा धक्का बसला आहे. 


या 18 आमदारांनी शशिकला- दीनकरन गटाचे समर्थन केले होते. यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली या आमदारांना अपात्र ठरविले होते. याविरोधात हे आमदार मद्रास उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. 12 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी 31 ऑगस्टला यावरील निकाल राखून ठेवला होता. या आमदारांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते. 




आज सकाळी मद्रास उच्च न्यायालयाने अण्णा द्रमुकच्या 18 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला. 



या निर्णयावर टीव्हीवी दिनकरन यांनी पत्रकारांना सांगितले की, हा आपल्यासाठी धक्का नाहीय. हा एक अनुभव आहे, परिस्थतीला सामोरे जाऊ. भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी 18 आमदारांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. 

Web Title: 18 MLAs of 'AIADMK' disqualified; Madras High Court upholds Tamil Nadu speaker's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.