ठळक मुद्देउत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये यमुना नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जणांना वाचविण्यात यश आलं असून त्यांना सध्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे

लखनऊ, दि. 14 - उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये यमुना नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना वाचविण्यात यश आलं असून त्यांना सध्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बोटीमध्ये 60   प्रवासी प्रवास करत होते. 


बागपत शहराजवळील काठा गावातील ग्रामस्थांची शेती यमुनेजवळ आहे. काही ग्रामस्थ गुरूवारी सकाळी यमुना नदीतून बोटीतून शेतावर जात होते. या बोटीत जवळपास ६० जण होते, असे सांगण्यात येत आहे. यमुना नदीत ही बोट बुडाली. यात १9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. बोटीतून क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.