दोन अपघातांमध्ये १७ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:00 AM2018-02-22T05:00:50+5:302018-02-22T05:01:00+5:30

चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक घरांत व चहाच्या दुकानात धडकून १0 जण ठार तर सहा जण जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी मध्य प्रदेशातील जबलपूर-मांडला रस्त्यावर बरेला

17 people killed in two accidents | दोन अपघातांमध्ये १७ जण ठार

दोन अपघातांमध्ये १७ जण ठार

Next

जबलपूर : चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक घरांत व चहाच्या दुकानात धडकून १0 जण ठार तर सहा जण जखमी झाले.
ही दुर्घटना बुधवारी मध्य प्रदेशातील जबलपूर-मांडला रस्त्यावर बरेला
येथे घडली. उभ्या असलेल्या बसमधून प्रवासी उतरत असताना त्यांना वाचवण्यासाठी हा १६ चाकांचा ट्रक जवळच्या घरांत व दुकानात धडकला. दुकानात बसलेले लोक जागीच ठार झाले, असे जबलपूरचे उप पोलिस महानिरीक्षक बी. एस. चौहान यांनी सांगितले.
संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या अधिकाºयाला धक्काबुक्की केली आणि पोलिसांचे वाहन पेटवून दिले. जमावाने रस्ता अडवून पोलिसांच्या तुकडीवर दगडफेकही केली. अपघातात ट्रकचीही मोठी हानी झाली असून, चालकाला अटक झाली आहे.
प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना सरकारकडून एक लाख रूपयांच्या भरपाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. या अपघाताबद्दल लोकांनी पोलिसांवर ठपका ठेवला. जड वाहनांना दिवसा शहरात मनाई असताना ते परवानगी देतात, असा रहिवाशांचा आरोप होता. (वृत्तसंस्था)

हैदराबाद : तेलंगणमध्ये कोताकोटा (जिल्हा वनापारथी) तालुक्यात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन कारची टक्कर होऊ न, सात जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला.हैदराबादहून कुर्नुलकडे अतिशय वेगात निघालेली कार सुरुवातीला रस्ता दुभाजकावर धडकून रस्त्याच्या दुसºया बाजुला जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाºया कारने तिला टक्कर दिली. मृतांमध्ये दोन्ही कारमधील लोकांचा समावेश आहे.

Web Title: 17 people killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.