गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

By संदीप प्रधान | Published: December 2, 2017 02:20 AM2017-12-02T02:20:59+5:302017-12-02T02:22:30+5:30

पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी...

 In 144,000 villages of Gujarat, BJP has imposed section 144, opposition to Dharan and Bandra, Tribal and fishermen aggressor | गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

googlenewsNext

वलसाड : पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी आदिवासी पट्ट्यातील चाकमांडला या दुर्गम गावात धरणामुळे विस्थापित होणा-या ग्रामस्थांमध्ये आणि उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर उभारण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने भाजपाला विरोध आहे.
चाकमांडला गाव धरमपूर विधानसभा मतदारसंघातील. या आदिवासीबहुल मतदारसंघावर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर उंबरगावमधून भाजपाचे रमण पाटकर तब्बल नववी निवडणूक लढत आहेत आणि बंदराला विरोध सुरू असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मेहसाणा, राजकोट, सूरत व नवसारी येथील ४ हजार गावांमध्ये भाजपा उमेदवारांना व कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करणारे फलक लावण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले आहे. पाटीदार समाजाच्या या विरोधाची चर्चा सर्वदूर पसरली आणि वलसाड, सूरतसारख्या शहरी भागांतील नाराज मतदारांनी वॉर्डांमध्ये आणि सोसायट्यांमध्येही भाजपासह सर्वच पक्षांना १४४ कलम लागू केले. राजकीय पक्षाचे उमेदवार व नेत्यांनी शहरी मतदारांच्या नाकदुºया काढून काही ठिकाणी हे फलक काढून टाकायला लावले.
पाटीदार समाजातील रोषाला निमित्त ठरला, तो तलाठ्यांच्या भरतीमधील दोन वर्षांपूर्वीचा घोटाळा. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ््याच्या धर्तीवर गुजरातमध्ये एक लाख रुपये घेऊन झालेली तलाठ्यांची भरती उच्च न्यायालयाने रद्द केली. तेथेच पाटीदारांच्या आंदोलनाची ठिणगी पडली. वलसाडमधील आदिवासीबहुल भागातील बोपी, वास्ता, धरमपूर व चाकमांडला गावे महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. धरणबांधणीमुळे चाकमांडला विस्थापित होण्याची भीती आदिवासींना आहे. बोपीतील आदिवासी ग्रामस्थ म्हणाले की, तिकडे जाऊन पाण्याची समस्या आहे का? धरणाची गरज आहे का? असे सवाल करू नका. लोक संतापून अंगावर धावून येतात.

रस्त्यावर बॅरिकेड्स

या गावांकडे जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स टाकले होते. निमलष्करी दलाचे जवान व स्थानिक पोलीस पुढे आले. कुठून आलात? या गावात का जायचे आहे? अशा असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली.
ओळखपत्र निरखून पाहिले. ईश्वरलाल पटेल नावाचा पोलीस अधिकारी बॅगा तपासताना पोलीस शिपायांना दारू, कॅश, हत्यार, बॉम्ब आहे का बघा, म्हणून सूचना करीत होता, त्यामुळे मोठी गंमत वाटली.
महाराष्ट्राच्या सीमेलगत ही गावे असल्याने दारू, पैसे, शस्त्रे गुजरातमध्ये येऊ शकतात. त्यामुळे आम्ही सतर्क असल्याचे या पोलीस अधिकाºयाने सांगितले.

उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर प्रकल्पाला तेथील मच्छीमारांचा विरोध आहे. हे बंदर उभे राहणार, हे निश्चित. मात्र, त्यामुळे उंबरगावमधील भाजपाचे उमेदवार रमण पाटकर यांची डोकेदुखी वाढली आहे. पाटकर यांनी आतापर्यंत आठ निवडणुका लढविल्या असून, ही त्यांची नववी निवडणूक आहे. त्यापैकी चार निवडणुकात ते विजयी झाले. जनता दलापासून वेगवेगळ््या पक्षांद्वारे त्यांनी निवडणूक लढविली होती.

धरणाचा अट्टाहास कशाला? : चाकमांडला गावाला भेट दिली, तेव्हा लोकांमध्ये धरणाबाबत कमालीची भीती असल्याचे जाणवले. जमिनीत व नदीला पुरेसे पाणी असताना धरणाचा अट्टाहास कशाला, असा सवाल आदिवासींनी केला. धरमपूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील खडकाळ रस्त्यावर ही गावे आहेत. घनदाट झाडी आणि कच्चा रस्ता पक्का करण्याची सुरू असलेली कामे हेच दृश्य दिसते.

Web Title:  In 144,000 villages of Gujarat, BJP has imposed section 144, opposition to Dharan and Bandra, Tribal and fishermen aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.