'दिल'दार भारत; 14 वर्षीय पाकिस्तानी मुलाला दिलं नवं जीवन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 04:06 PM2018-11-22T16:06:05+5:302018-11-22T16:06:36+5:30

हृदयाचा त्रास असलेल्या पाकिस्तानमधील एका लहान मुलावर नवी दिल्लीतील एका रुग्णालयाने उपचार करून त्याला नवे जीवन दिले आहे.

14-year-old Pakistani boy gave new life | 'दिल'दार भारत; 14 वर्षीय पाकिस्तानी मुलाला दिलं नवं जीवन! 

'दिल'दार भारत; 14 वर्षीय पाकिस्तानी मुलाला दिलं नवं जीवन! 

नवी दिल्ली -  भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचा हाडवैरी. मात्र असे असले तरी वैद्यकीय उपचारांसाठी हजारो पाकिस्तानी रुग्ण भारतात येत असतात. तसेच भारताकडूनही दिलदारपणा दाखवत अशा रुग्णांवर उपचार केले जातात. असाच एक प्रकार समोर आला आहे. हृदयाचा त्रास असलेल्या पाकिस्तानमधील एका लहान मुलावर नवी दिल्लीतील एका रुग्णालयाने उपचार करून त्याला नवे जीवन दिले आहे. 

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या जगदीश राम या छोट्या बालकाचा काही काळापासून श्वास कोंडू लागला होता. १४ महिन्यांच्या जगदीशची तपासणी केली असता त्याच्या हृदयातील डाव्या बाजूच्या वरचा भाग प्रमाणापेक्षा वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या.  त्याशिवाय त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूला एक आजारही होता. त्यामुळे रक्तवाहिनीमधून स्राव होत होता. तसेच हृदयाच्या डाव्या आणि उजव्या पाकळ्यांच्या म्हध्ये एक भोकही होते. 

जन्मताच हृदयासंबंधीचे तीन आजार जडलेल्या जगदीश राम याला पाकिस्तानमधून उपचांरांसाठी गंगाराम रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. इथे डॉक्टरांना त्याच्यावरील उपचारांचे आव्हान स्वीकारले आणि त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय उपचारांच्या इतिहासात एवढ्या लहान मुलाच्या एवढे मोठे लेफ्ट एट्रियम कापून कधीच सामान्य बनवण्यात आलेले नाही. जगातील विख्यात वैद्यकीय  नियतकालीक असलेल्या द एनल्स ऑफ थोरोसिक सर्जरीनेसुद्धा प्रकाशिक करण्यासाठी ही केस स्वीकारली आहे.  
 

Web Title: 14-year-old Pakistani boy gave new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.