समाधानकारक काम न करणारे १२०० आयपीएस चौकशीच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:32 AM2019-05-10T04:32:46+5:302019-05-10T04:33:01+5:30

समाधानकारक काम न करणारे  1200 IPS inquiries round-the-clock

1200 IPS inquiries round the clock without satisfactory work | समाधानकारक काम न करणारे १२०० आयपीएस चौकशीच्या फेऱ्यात

समाधानकारक काम न करणारे १२०० आयपीएस चौकशीच्या फेऱ्यात

Next

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) समाधानकारक काम न करणारे जवळपास १२०० अधिकारी गृह मंत्रालयाच्या चौकशीच्या फेºयात आहेत. एका अधिकाºयाने ही माहिती देताना सांगितले की, गत तीन वर्षांत ११८१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची समीक्षा करण्यात आली आहे.
या अधिकाºयाने सांगितले की, तपासाच्या कक्षेत असलेल्या अधिकाºयांची संख्या वाढू शकते. २०१६ आणि २०१८ च्यादरम्यान असमाधानकारक कामगिरी करणाºया अधिकाºयांच्या सेवा रेकॉर्डची समीक्षा अखिल भारतीय सेवा नियम, १९५८ च्या नियम १६ (३) अंतर्गत करण्यात आली आहे. नियमानुसार केंद्र सरकार एखाद्या आयएएस अधिकाºयास किमान तीन महिने आधी नोटीस देऊन अथवा नोटीसऐवजी त्यांना तीन महिन्यांचे वेतन देत सेवानिवृत्तीचे आदेश देऊ शकते.
एकूण ११८१ आयपीएस अधिकाºयांपैकी १० अधिकाºयांना वेळेपूर्वी सेवानिवृत्तीची शिफारस करण्यात आली आहे. अर्थात, अधिकाºयाने या अधिकाºयांच्या नावांचा खुलासा केला नाही.

Web Title: 1200 IPS inquiries round the clock without satisfactory work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.