११ मुलींची हत्या; ३ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:28 AM2019-05-07T05:28:06+5:302019-05-07T05:28:37+5:30

बिहारमधील मुजफ्फरपूर येथील निवारागृहात (शेल्टर होम) ११ मुलींच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला तो करीत असलेल्या या प्रकरणाचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्यास सोमवारी सांगितले.

11 girls killed; Order to report till June 3 |  ११ मुलींची हत्या; ३ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

 ११ मुलींची हत्या; ३ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

Next

नवी दिल्ली : बिहारमधील मुजफ्फरपूर येथील निवारागृहात (शेल्टर होम) ११ मुलींच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला तो करीत असलेल्या या प्रकरणाचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्यास सोमवारी सांगितले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याची सुनावणी तीन जून रोजी सुटीतील खंडपीठासमोर होईल, असे म्हटले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सीबीआयची बाजू मांडली. ते म्हणाले, मुजफ्फरपूर निवारागृहात ११ मुलींची हत्या झाली असून, त्यांना पुरलेल्या ठिकाणाहून सीबीआयने हाडेही जप्त केली आहेत. सीबीआयला तीन जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करणे शक्य नाही. सीबीआयने ठाकूरसह २१ जणांवर आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने शपथपत्रात म्हटले होते की, चौकशीत ११ मुलींची नावे समोर आली आहेत.

अनेक मुलींचे शोषण झाल्याचा आरोप

या हत्याकांडातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी ११ मुलींची हत्या केली असून, त्यांना जेथे पुरले त्या ठिकाणाहून हाडे जप्त करण्यात आले आहेत, असे सीबीआयने न्यायालयाला तीन मे रोजी सांगितले होते. स्वयंसेवी संस्थेकडून चालविल्या जात असलेल्या या निवारागृहात अनेक मुलींवर बलात्कार व लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.

Web Title: 11 girls killed; Order to report till June 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.