११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 4:46am

दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत. भाजपाचे तत्कालीन संसद सदस्य वाय.जी. महाजन, छत्रपाल सिंह लोढा, अण्णासाहेब एम. के. पाटील, चंद्र प्रताप सिंह, प्रदीप गांधी, सुरेश चंदेल, काँग्रेसचे रामसेवक सिंह, बसपाचे नरेंद्र कुशवाहा, लालचंद्र कोल, राजा रामपाल व राजदचे मनोज कुमार यांना आरोपी केले आहे. सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, कोर्टाने बसपाचे राजा रामपाल यांचे तत्कालीन पीए रविंद्र कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले. दिल्ली पोलिसांनी २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. दोन पत्रकारांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते. हा खटला १२ जानेवारी रोजी सुरूहोणार आहे.

संबंधित

न्या. ताहिलरामाणी मद्रासच्या मुख्य न्यायाधीश
अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली
विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास
कंडोमच्या विल्हेवाटबाबत धोरण निश्चित करावे
पी. चिदम्बरम यांचे एअरसेल-मॅक्सीस घोटाळा आरोपपत्रात नाव

राष्ट्रीय कडून आणखी

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला
No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी
‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही
No Confidence Motion : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी
No Confidence Motion : राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्ला

आणखी वाचा