जिल्हा परिषदही उतरणार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:34 AM2018-04-18T00:34:59+5:302018-04-18T00:34:59+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व क्रीडासंघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षांनी आपण खेळाडूंबरोबर असल्याचे सांगितले.

Zilla Parishad will also come down to the ground | जिल्हा परिषदही उतरणार मैदानात

जिल्हा परिषदही उतरणार मैदानात

googlenewsNext
ठळक मुद्दे स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व क्रीडासंघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षांनी आपण खेळाडूंबरोबर असल्याचे सांगितले.
महापालिकेने अशोकस्तंभ ते गडकरी चौकापर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयास शहरातील क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
संघटनांन्ी महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे शिवाजी स्टेडियम असून, ३० वर्षांच्या कराराने मैदान क्रीडा कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मैदानावर स्थानिक खेळाडू सराव करीत असतात तसेच विविध प्रकारच्या राज्य आणि राष्टÑीय पातळीवर अनेक स्पर्धादेखील होत असतात. महापालिकेने स्मार्ट रस्त्याचे नियोजन करताना या मैदानावर मात्र अंडरग्राउंड दोन मजली वाहनतळाचे नियोजन केले आहे.

Web Title: Zilla Parishad will also come down to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.