जिल्हा परिषदेकडून १७ शाळा अनधिकृत घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:24 AM2019-06-16T01:24:16+5:302019-06-16T01:25:12+5:30

सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असताना जिल्हा परिषदेने मान्यता नसलेल्या शाळांना अनधिकृत ठरवून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी म्हटले आहे.

Zilla Parishad declared 17 schools unauthorized | जिल्हा परिषदेकडून १७ शाळा अनधिकृत घोषित

जिल्हा परिषदेकडून १७ शाळा अनधिकृत घोषित

Next

नाशिक : सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असताना जिल्हा परिषदेने मान्यता नसलेल्या शाळांना अनधिकृत ठरवून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविली असता, त्यात जिल्ह्यात जवळपास १७ शाळा विना परवानगी सुरू असल्याचे आढळून आले आहे. त्यात येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेची जनता विद्यालय, पिंपळगाव जमाल येथील जनता विद्यालय, त्र्यंबकेश्वर येथील ब्लूमिंग वर्ड इंग्लिश मीडिअम स्कूल, निफाड तालुक्यातील खेरवाडी व चित्तेगाव येथील माउली विठाई बहुद्देशीय संस्थेची न्यू गुरुकुल पब्लिक स्कूल, बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील शामलाताई बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल, औंदाणे येथील जनता विद्यालय, निरपूर येथील जनता विद्यालय, मुळाणे येथील जनता विद्यालय, इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील नूतन आदर्श इंग्लिश मीडिअम स्कूल, नाशिक तालुक्यातील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विद्यालय शिंदे, मखमलाबाद येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अभिनव बालविकास मंदिर, वासाळी येथील सेंट थॉमस मलांकारा कॅथेलिक स्कूल, कळवण तालुक्यातील अभोणा येथील आयडीयल इंग्लिश मीडिअम स्कूल, ओतूर येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल, मनमाड येथील लिटल लॅम्ब्स, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचा समावेश आहे.

Web Title: Zilla Parishad declared 17 schools unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.