चांदेश्वरी घाटात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:12 PM2018-06-26T23:12:32+5:302018-06-26T23:13:41+5:30

नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसीन व त्याचे वडील शब्बीर (६५) कासारीनजीक चांदेश्वरी घाटातून जात असताना, शब्बीर लघुशंकेसाठी खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Youth murdered in Chandeshwari Ghat | चांदेश्वरी घाटात युवकाचा खून

चांदेश्वरी घाटात युवकाचा खून

Next
ठळक मुद्देचाकूहल्ला : अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू

नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसीन व त्याचे वडील शब्बीर (६५) कासारीनजीक चांदेश्वरी घाटातून जात असताना, शब्बीर लघुशंकेसाठी खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.
छातीवर व गळ्यावर धारदार शस्त्रामुळे मोठ्या जखमा झाल्याने रक्तस्त्राव होऊन मोहसीनचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी शब्बीर पठाण यांनी घर दुरुस्तीला काढले. तेव्हा शेजारी कादर रहिमतुल्ला व शब्बीर यांच्यात ओट्यावर बसून मोठ्या आवाजात वाद चालला आहे, असे वाटल्याने कादर यांच्या मुलांनी मोहसीन याच्या डोक्यावर लाकूड मारले होते. त्यात तो जखमी झाला होता. औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार होऊन कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर मोहसीन याच्या आईला शेजारच्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे मंगळवारी नांदगाव पोलिसांत तक्र ार दाखल करण्यासाठी मोहसीन व त्याचे वडील आले होते. ते परत जात असताना सदर घटना घडली.

Web Title: Youth murdered in Chandeshwari Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा