उड्डाणपुलावरील कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:12 AM2018-03-24T01:12:55+5:302018-03-24T01:12:55+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़ भूषण सुरेश सोनवणे (रा. मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Youth killed in road accidents | उड्डाणपुलावरील कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

उड्डाणपुलावरील कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

Next

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़ भूषण सुरेश सोनवणे (रा. मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर कंटेनर (एमएच ०४, एफक्यू ७७५६) उभा होता़ या कंटेनरचालकाने पार्किंग लाईट वा रस्त्यावर उभा असल्याची ओळख पटेल अशी कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती़ यावेळी पाथर्डी बाजूकडील उड्डाणपुलावरून दुचाकीवर (एमएच १५, एव्ही ५१३८) भूषण सुरेश सोनवणे (२४) व त्याचा सहकारी ललित दोधा सोनवणे (२२, दोघेही रा़ मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक) हे दोघे येत होते़  भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभा असलेला कंटेनर लक्षात न आल्याने सोनवणे याची दुचाकी पाठीमागून या कंटेनरला जाऊन धडकली़ यामध्ये दुचाकीचालक भूषण सोनवणे हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला ललित सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे़ या प्रकरणी गंभीर जखमी ललित सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालकाविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
उड्डाणपुलावर दुचाकी, तीनचाकी वाहनांना बंदी
नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनांना बंदी असून, या नियमाचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते़ मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने सर्रास उड्डाणपुलावरून दुचाकी ये-जा करतात़ उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक दुचाकींचे अपघात झाले असून, यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे़ उड्डाणपुलावर या छोट्या वाहनांना बंदी असताना अशी वाहने चालविणाºयांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे़

Web Title: Youth killed in road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात