आपचे ‘झाडू मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:40 AM2018-08-04T01:40:45+5:302018-08-04T01:41:07+5:30

नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर स्वच्छता मोहीम राबविली.

Your 'sweep bounce' movement | आपचे ‘झाडू मारो’ आंदोलन

आपचे ‘झाडू मारो’ आंदोलन

Next

नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर स्वच्छता मोहीम राबविली.
नाशिक महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपा एका बाजूला स्मार्ट सिटीच्या गोष्टी करीत असताना प्रत्यक्षात मात्र नाशिक शहरातील सर्व प्रमुख रस्ते धूळ, चिखल आणि कच यामुळे अतिशय अस्वच्छ आणि असुरक्षित झाले आहेत. अनेक वेळा वाहनचालक या चिखल आणि धुळीवरून पडत आहेत. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी रस्त्यावरील प्रवास धोकादायक आणि जीवघेणा ठरतो आहे. याविषयी जनजागृती करावी तसेच निद्रिस्त मनपा प्रशासन आणि मुजोर नगरसेवक यांना जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी नाशिककडून संपूर्ण नाशिक महानगरात ‘झाडू मारो अभियान’ सुरू करण्यात आले. नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यांची सफाई यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी स्मार्ट सिटीचे राहू द्या, आधी स्वच्छ आणि सुरक्षित रस्ते द्या, अशी मागणी करत भाजपावर टीका केली. जगबीर सिंग, नितीन शुक्ल, विकास पाटील, विलास देसले, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, शुभम पडवळ, भूषण ताटिया, संतोष राऊत, सचिन पवार, चंद्रशेखर महानुभाव आदी उपस्थित होते.

Web Title: Your 'sweep bounce' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.