लष्कर भरतीच्या अफवेमुळे तरुण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:43 AM2018-10-17T00:43:43+5:302018-10-17T00:44:31+5:30

सोशल माध्यमात देवळाली कॅम्प येथे लष्करी जवानांची भरती असल्याचा संदेश व्हायरल झाल्याने या भरतीसाठी रविवारी मध्यरात्री देशभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण कॅम्प येथे दाखल झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी सदरचे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्यानंतर शेकडो तरुण निराश मनाने माघारी फिरले.

 Young people filed for military recruitment rumors | लष्कर भरतीच्या अफवेमुळे तरुण दाखल

लष्कर भरतीच्या अफवेमुळे तरुण दाखल

Next

देवळाली कॅम्प : सोशल माध्यमात देवळाली कॅम्प येथे लष्करी जवानांची भरती असल्याचा संदेश व्हायरल झाल्याने या भरतीसाठी रविवारी मध्यरात्री देशभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण कॅम्प येथे दाखल झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी सदरचे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्यानंतर शेकडो तरुण निराश मनाने माघारी फिरले.  देवळाली कॅम्प येथील लष्करी विभागात कायम भरतीप्रक्रिया सुरू असते. त्यासाठी रीतसर जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया राबविली जाते. असे असतानाही अलीकडच्या काळात सोशल माध्यमातून भरतीच्या पोस्ट व्हायरल केल्या जात असून, त्यातून परराज्यातील तरुणांची दिशाभूल केली जाते. रविवारी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात तरुण दाखल झाले. तरुणांनी खातरजमा केल्याशिवाय भरतीसाठी येऊ नये, असे लष्कराने आवाहन केले आहे.  सोशल मिडीयावरील बनावट भरतीच्या जाहिरातीला आळा घालण्याबाबत लष्कराला अद्यापही यश आलेले नाही.

Web Title:  Young people filed for military recruitment rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.