नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:18 AM2019-06-24T00:18:04+5:302019-06-24T00:18:30+5:30

जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले.

 Yogasana of women in swimming pool in Nashik Road | नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

googlenewsNext

नाशिकरोड : जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. यावेळी सुनीता सोनगिरे, सुरेखा पाटील, मानसी झनकर, स्नेहा सोनवणे, प्रणाली आहिरे, योगेश चौरे, शोभा गरुड, रेवती बुरकुले, अरुण काळे उपस्थित होते.
उपनगर महाराष्ट हायस्कूल
उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षक आरती जगवानी तसेच शाळेतील शिक्षक तानाजी पाटोळे यांनी योग प्रात्यिक्षके करून दाखिवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा साबळे यांनी केले. यावेळी शिक्षक मोनिका चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, बाळू चौधरी, सुनील सोनवणे, योगीता साळवे, वृषाली जायभावे, वंदना ठाकूर, बिंदू वाघेला, युवराज दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.
मनपा शाळा ६१
देवळालीगाव तेलीगल्ली मनपा शाळा ६१ मध्ये योग शिक्षक रूपेश व नीलेश यांनी योगासने व प्राणायामाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा गुंजाळ तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
डॅफोडिल वंडर एज्युकेशन
जेलरोड येथील डॅफोडिल वंडर एज्युकेशनल पार्कआणि मानूर येथील आनंद महाराज कॉलेजमध्ये जागतिक योग दिन मुख्याध्यापिका पायल पंजाबी व आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्या डांगे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. सुजाता महाले यांनी योगाचे महत्त्व सांगितले. उर्मिला भालेराव यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रकार शिकवले. आभार शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी मानले.
नासाका माध्यमिक विद्यालयात
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी योग शिक्षक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची योगासने सादर केली. मुख्याध्यापक शंकर पिंगळे व शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी योग दिनाची माहिती दिली.
संत आईसाहेब स्कूल
पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये योग शिक्षक विठ्ठल पवार यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेत त्यांना योगाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक टी. के. गाडे, एस. व्ही. बोरसे, एम. डी. संधान, बी. के. जाधव, ए. डी. गायखे, श्याम साबळे, विद्या काकळीज आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. के. जाधव यांनी केले.
रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम
काठेगल्ली येथील रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्रायमरी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, गरुडासन अशा विविध योगासनांचे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सदर आसने करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री यांनी सुदृढ आयुष्याची गुरूकिल्ली म्हणजे योगा असे सांगितले. योग दिनाचे महत्त्व सुजाता पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्कॉटिश अकॅडमी
४जेलरोड येथील स्कॉटिश अकॅडमी शाळेत पतंजली संस्थेच्या सेविका प्रमिला सहाणे, प्रतिभा बोराडे, सीमा वाजे, अलका लोखंडे, पुष्पलता माळवे, छाया गवांदे, ज्योती माळवे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व सांगून विविध आसने करून घेतली. मुख्याध्यापिका रमादेवी रेड्डी यांनी आभार मानले.
जलतरण तलावात योगासने
मनपाच्या नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे योग दिनानिमित्त महिला जलतरणपटूंनी तलावामध्ये योगासने केली. व्यवस्थापिका माया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व योग शिक्षिका कांता वराडे, ज्योती वराडे यांनी योगासने केली.या उपक्रमात ज्योती जाधव, गीता मंगवाना, मंगला वाघ, स्मिता शिंदे आदी सहभागी झाल्या होत्या.

Web Title:  Yogasana of women in swimming pool in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.