येवला : पतंगाच्या नायलॉन मांजाने कापला येवल्यात युवकाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:40am

पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला.

येवला : पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला. वेगात असल्याने मांजा गळ्यात जोरदारपणे घुसला आणि गळा कापल्याने रक्ताची धार लागली. गंभीर जखमी अवस्थेत काही युवकांनी प्रसंगावधान राखत रक्तस्त्राव थांबण्यासाठी गळ्याला रुमाल बांधला व रुग्णालयात दाखल केले. युवकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याच्यावर ३५ ते ४० टाके घालावे लागले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळेवर उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला. रहीमतुद्दीन अस्मत अली खान असे या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली असताना संक्रांतीला अद्याप दोन महिने बाकी असताना अशी घटना घडली आहे.

संबंधित

आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण
नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना मोक्कान्वये सक्तमजुरी
नाशिकमधील सराईत घरफोड्या नेपाळमध्ये हॉटेल व्यवसायिक
कुख्यात हिमरत गँगचा म्होरक्या मुकुंदवाडीत जेरबंद
सोनसाखळी खेचणा-या इराणी टोळीस दिल्लीहून अटक

नाशिक कडून आणखी

गायक शिंदे पिता-पुत्र येणार ‘आमने-सामने’
आमिषापोटी आठ लाखांना गंडा
पाणीकपातीचे संकेत
भाजीमार्केट ओटेधारकांची अनामत जप्त
जैविक खते, पिके ही काळाची गरज : देसले

आणखी वाचा