नाशिकची कामे पळविण्याचे काम : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:56 AM2019-01-17T00:56:19+5:302019-01-17T00:57:11+5:30

घोटी : नाशिकची कामे इतरत्र पळवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यावरून मला तुरुंगात टाकलं त्या कामाच्या ठेकेदाराचे १०० कोटी अडकवले आहेत. जेव्हा ठेकेदाराला पैसे मिळत नाहीत तेव्हा मी भ्रष्टाचार कसा केला असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी केला.

Work of Nashik's work: Bhujbal | नाशिकची कामे पळविण्याचे काम : भुजबळ

नाशिकची कामे पळविण्याचे काम : भुजबळ

Next
ठळक मुद्देया सरकारने राममंदिराचा मुद्दा काढून लोकांचे लक्ष बाजूला केले आहे.

घोटी : नाशिकची कामे इतरत्र पळवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यावरून मला तुरुंगात टाकलं त्या कामाच्या ठेकेदाराचे १०० कोटी अडकवले आहेत. जेव्हा ठेकेदाराला पैसे मिळत नाहीत तेव्हा मी भ्रष्टाचार कसा केला असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा इगतपुरी तालुक्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ेविरोधी पक्षनेते मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, आमचे सरकार होते त्यावेळी पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांची किंमत फार कमी होती. आज सरकारमुळे महागाई अनेकपटीने वाढली आहे. आता शेतकऱ्यांसह कोणावरही अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी खासदार समीर भुजबळ यांचीही भाषणे झाली. यावेळी फौजिया खान, आमदार किरण पावसकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुद्धे, माजी आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तुकाराम वारघडे यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. सरपंच परिषदेचे अध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी सरपंचाच्या विविध मागण्या आणि काँग्रेसचे भास्कर गुंजाळ यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भात मुंढे यांना निवेदन दिले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की कर्मकांडी आणि सनातन्यांच्या या सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवले आहे. यासह सर्वांचे आरक्षण कधी नव्हे तेवढे धोक्यात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान विरोधाचे प्रतीक आहे. लोकांना भूलथापा देणाºया या सरकारने राममंदिराचा मुद्दा काढून लोकांचे लक्ष बाजूला केले आहे.

Web Title: Work of Nashik's work: Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.