लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा

By admin | Published: July 25, 2014 12:18 AM2014-07-25T00:18:32+5:302014-07-25T00:42:14+5:30

जयंती कार्यक्रम : शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांकडून अभिवादन

The work of Lokmanya Tilak is shine forth | लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा

लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा

Next

लोकमत चमू ल्ल नाशिक
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले होते. विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांच्या वतीने टिळकांच्या कार्याला
उजाळा देण्यात आला.प्रकाश फाउंडेशन
येथील प्रकाश फाउंडेशनतर्फे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम गोसावी, बाळासाहेब मते, संजय जाधव उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पवार होते. प्रारंभी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल मयूर गऊल व दर्शना कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अर्चना धामोडे हिने सूत्रसंचालन केले. विशाल शेटे याने आभार मानले.
प्रभाग क्र. ५
पंचवटीतील प्रभाग क्र. ५ मध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पंचवटी प्रभाग सभापती शालिनी पवार व माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, एस. आर. शिंदे, राहुल खांदवे, संदीप बोडके, राहुल पवार, किरण काकड, दीपक करकाळे, शरद ओझरकर, संदीप वडजे उपस्थित होते.

Web Title: The work of Lokmanya Tilak is shine forth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.