सिन्नर नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:54 AM2018-07-19T00:54:01+5:302018-07-19T01:07:30+5:30

सिन्नर : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये रस्त्यांची व गटारीची कामे, पथदीप, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. वारंवार मागणी करुनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली.

Women's Front on Sinnar Nagar Parishad | सिन्नर नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा

सिन्नर नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देसमस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन

सिन्नर : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये रस्त्यांची व गटारीची कामे, पथदीप, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. वारंवार मागणी करुनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने महिलांनी नगराध्यक्ष किरण डगळे आणि मुख्याधिकारी व्यकंटेश दूर्वास यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर त्यांनी प्रभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
नगरसेवक वासंती देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी दुर्वास यांच्या दालनात नगरसेवक देशमुख यांच्यासह विरोधी गटनेते नामदेव लोंढे, रामभाऊ लोणारे, संतोष शिंदे, मालती भोळे, मदन देशमुख, माजी नगरसेवक बाळासाहेब कमानकर, अशोक मोरे, हर्षद देशमुख, कृष्णा कासार आदींनी चर्चा केली. नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने समस्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्या आली. याकडे महिलांनी लक्ष वेधले.
मोर्चात कुसूम घोरपडे, स्नेहा पटेल, मीना पटेल, रोहीणी भालेराव, सुनिता तांबे, वैशाली बोºहाडे, अनुराधा आरोटे, कल्पना ढोली, संगीता वाजे, सोनाली देशमुख, मोनाली आहेर, कल्पना निरगुडे, ललित शेखावत, मीना सिंग, मंगल नवले, वंदना नन्नावरे, नंदा वारुंगसे, चित्रा क्षत्रिय, कविता कोकाटे, निता पानसरे, वैशाली बोºहाडे, अनुराधा आरोटे, आश्लेषा देखमुख, नंदा मोरे, आश्विनी पानेकर, अलका सदगीर, कविता कोकाटे, निता पानसरे, शोभा तनपुरे आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या. समस्या सोडविण्याचे आश्वासनया प्रभागातील समस्या सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवक देशमुख यांनी केला. पावसाळ्यात तात्पुरते खडीकरण करण्याची मागणी महिलांनी केली. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी प्रभागातील समस्यांची पाहणी करावी, अन्यथा आम्ही पालिकेत ठिय्या देऊ अशी भूमिका महिलांनी घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष डगळे, मुख्याधिकारी दूर्वास यांनी प्रभागात जाऊन पाहणी केली व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Women's Front on Sinnar Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा