मेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापा परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:37 AM2017-11-24T00:37:54+5:302017-11-24T00:40:29+5:30

Women on the streets in the raid on Marie-Rasbihari raid; Two suspects in custody | मेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापा परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात

मेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापा परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापा परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात


मेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापा

परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात

पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठ्याच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरुवारी (दि.२३) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाºया कोलकाता येथील दोन मुलींसह दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पिटान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
पंचवटीतील मेरी - रासबिहारी लिंकरोडवरील अमृतधाम येथील एका गायी म्हशीच्या गोठ्यामागे संशयित संतोष कारभारी खैरे (४२, राहणार अमृतधाम) व त्याचा आसाम येथील साथीदार अल्फास मिया ऊर्फ राजू (३२) हे दोघे गत काही वर्षांपासून विविध राज्यांतील महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून काही बनावट गिºहाईक पाठविले़ या गोठ्यामागे बांधलेल्या खोलीत युवती व महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्री

Web Title: Women on the streets in the raid on Marie-Rasbihari raid; Two suspects in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा