महिलांनी तणावमुक्त स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:03 PM2018-08-19T14:03:23+5:302018-08-19T14:13:19+5:30

रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भाविनक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरु न जातात. परंतु, अशा परिस्थितीतही महिलांनी स्वत:ची स्वप्न उराशी बाळगून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन स्वच्छंदी जीवन जगलं पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले आहे.

Women should live a stress free life: Kishore Pathak | महिलांनी तणावमुक्त स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

महिलांनी तणावमुक्त स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे कवी किशोर पाठक यांचे प्रतिपादनठेवा संस्कृतीचातर्फे प्रतिभावंत पुरस्कारांचे वितरण

नाशिक : रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भाविनक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरु न जातात. परंतु, अशा परिस्थितीतही महिलांनी स्वत:ची स्वप्न उराशी बाळगून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन स्वच्छंदी जीवन जगलं पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले आहे.
शरणपूररोड परिसरातील ज्योतीकलश सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत ह्यठेवा संस्कृतीचाह्ण व्हॉटस गृपतर्फे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिचोलीच्या सरपंच गितांजली आव्हाडयांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व रेखा केतकर यांना अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिभावंत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहूणे सदानंद जोशी, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गितांजली आव्हाड उपस्थित होते. किशोर पाठक म्हणाले, आयुष्यात सुख: आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायला ही शिकलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणार्या, बोचणार्या क्षणिक भाविनक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे असे मत किशोर पाठक यांनी व्यक्त के ले. यावेळी गायत्री बळगे, वैशाली साठे, सायली सप्रे, त्रिवेणी गोमासे, मणाली गर्गे, वैशाली घोडके, वैशाली शुक्ल आदि संस्कृती ठेवाचे सदस्य उपस्थित होते.ठेवा संस्कृतीचा हा सोशल मिडियावरील महिलांचा गृप असून या महिलांनी व्हॉटसग्रुप तयार करून त्याद्वार संस्कृती व परंपारांचे जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

Web Title: Women should live a stress free life: Kishore Pathak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.