जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:37 AM2019-04-17T01:37:16+5:302019-04-17T01:38:25+5:30

जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 Windy winds in the district; Electricity collapses and killed three more | जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

Next

नाशिक : जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात अवकाळी पावसाने  आठ बळी घेतले, तर मोठ्या प्रमाणावर पशुधनाचीही
हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही नुकसान झाले आहे.  मंगळवारी जिल्ह्णातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेचा कडकडाट करीत पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी गावाच्या उत्तरेला न्याहाराई माता मंदिराचे पुजारी संपत उदार (६५) या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी भागांत दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला असून, शेतकºयांची धावपळ उडाली आहे, तर बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात योेगेश बापू शिंदे (३२) हा तरुण मेंढ्या चारत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यात झाडाखाली आश्रय घेतलेल्या योगेश शिंदे याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योेगेश हा साक्री तालुक्यातील आयाने येथील रहिवासी आहे. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने त्याच्या गावी नेण्यात आले. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीच्या अंगावर दुपारी ३ वाजता वीज पडल्याने दगावली आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथे अंगावर वीज पडून हौसाबाई कुंवर (७१) ही वृद्धा जागीच ठार झाली तर तिच्या शेजारीच बांधलेली शेळी देखील दगावली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्णातील हवामानात कमालीचा बदल झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली. मालेगाव येथे सोमवारी रात्री वादळी वाºयामुळे झाड कोसळून विकास अग्रवाल यांचा मृत्यू झालेला असताना मंगळवारी सकाळी ८ वाजता अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. रविवारी दिंडोरी तालुक्यात तीन व चांदवड तालुक्यात एक अशा चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून, त्यापाठोपाठ पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.
अवकाळी पावसाने सटाणा, मालेगाव, सिन्नर, नाशिक व निफाड तालुक्यांमधील ६८ गावे बाधित झाले असून, सुमारे २१ घरांची पडझड होऊन नऊ जनावरे दगावली.

Web Title:  Windy winds in the district; Electricity collapses and killed three more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.