सोसायटीच्या थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:10 AM2018-03-01T02:10:44+5:302018-03-01T02:10:44+5:30

विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत.

Will disqualify the Society's defaulting directors | सोसायटीच्या थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरविणार

सोसायटीच्या थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरविणार

Next

नाशिक : विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत. बुधवारी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे व अहेर यांनी दिंडोरी तालुक्यातील जिल्हा बॅँकेच्या कर्मचारी, अधिकाºयांची बैठक घेऊन कर्जवसुलीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना कºहे यांनी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी फक्त ३० दिवस शिल्लक असून, ज्याप्रमाणे परीक्षेच्या काळात चांगल्या गुणांची अपेक्षा असते त्याचप्रमाणे सर्वांनी वसुलीचे काम करायचे आहे. कलम १०१ च्या दाखल्यानुसार कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यास ट्रॅक्टर जागेवर नसल्यास संबंधित थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर निबंधक कार्यालयात प्रकरण दाखल करावे व त्या निकालानंतर संबंधित थकबाकीदाराच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे नाव लावून सदर मालमत्ता बॅँकेची होईल. ट्रॅक्टर कर्जवसुलीसाठी गेल्यावर ट्रॅक्टर जागेवर न सापडल्यास पंचनामा करून थकबाकीदाराविरुद्ध ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना केल्या. पंधरा दिवसांनंतर आपण पुन्हा वसुलीचा आढावा घेऊ, असेही ते म्हणाले. अध्यक्ष केदा अहेर यांनी दिंडोरी तालुक्यातील दोन विभागांतच बॅँकेच्या एकूण कर्जाच्या ३० ते ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले असून, जे कर्ज वाटप केले आहे त्याची माहिती कर्मचारी व अधिकाºयांना आहे. त्यामुळे ३१ मार्चअखेर नियोजनबद्ध काम करून वसुली करा. जर वसुली करण्यात अपयशी ठरले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
कर्जवसुलीचा आढावा घेण्यासाठी बॅँकेच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार असलेल्या बॅँकेच्या सेवकांनी आठ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्याचा इशाराही दिला. यावेळी स्थानिक संचालक गणपतराव पाटील यांनी थकबाकी वसुलीसाठी मदत करण्याचे तसेच वसुलीकामी कुचराई करणाºयांवर बॅँक अध्यक्षांनी कारवाई केल्यास आपली हरकत राहणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Will disqualify the Society's defaulting directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक