नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 07:00 PM2019-07-23T19:00:54+5:302019-07-23T19:02:32+5:30

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट रोडसह अन्य अनेक विषयातून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनाम देऊ असे म्हणतात मग राजीनामा देत नाही असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्तया आणि ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे.

Why don't 'they' directors of Nashik's smart city resign? | नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

Next
ठळक मुद्देकॉँग्रेस नेत्या हेमलता पाटील यांचा प्रश्नकंपनी संचालकांच्या कारभारावर केली टीका

नाशिक-स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट रोडसह अन्य अनेक विषयातून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनाम देऊ असे म्हणतात मग राजीनामा देत नाही असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्तया आणि ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे.

स्मार्ट रोडच्या रखडलेल्या कामावरून हेमलता पाटील यांनी सोमवारी (दि.२२) आंदोलन देखील केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी कंपनीचे संचालकांवर देखील टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. परंतु मोदी यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेची वासलात लावण्याचा विडाच उचलला आहे. शहरात कामे करताना कोणती विकास कामे केली पाहिजे आणि त्याचा नाशिककरांना फायदा होणार आहे, याची माहिती नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मिळत नाही. कालीदास कलामंदिर, नेहेरू उद्यान, कलादालान या प्रकल्पांवर निविदेच्या पलिकडे जाऊन मोठा खर्च झाला आहे. ग्रीन सिटी प्रकल्प शेतकºयांवर लादण्यात आला आहे.

पॅन सिटी व वॉटर सप्लाय प्रोजेक्ट यासंदर्भात सत्ताधिकारी पक्षाच्या आमदारांनीच बहिष्कार घालून या योजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील स्काडा मीटर प्रकरणी कंपनी अध्यक्षांनी निविदा रद्द केल्यानंतर बैठकीतच त्या गैरसमजामुळे झाल्याचे साांगून हीच प्रक्रिया कार्यान्वीत केली. ज्या संचालकांनी या प्रकल्पाला विरोध केला तेच संचालक या बैठकीस उपस्थित होते. काही संचालक स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून राजीनाम्याची भाषा करतात. परंतु अद्याप पर्यंत कोणीही राजीनामा दिलेला नाहीं असेही त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

Web Title: Why don't 'they' directors of Nashik's smart city resign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.