एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:45 PM2018-12-09T23:45:21+5:302018-12-09T23:48:31+5:30

पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.

Who will get water of unity? | एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

Next
ठळक मुद्देगोदावरी की गिरणा मोसम पाण्यावरून भविष्यात श्रेयवादाची रंगणार लढत

रामदास शिंदे।
पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.
नाशिक जिल्ह्याचे क्षेत्र साधारणपणे गोदावरी व गिरणा अशा दोन प्रमुख खोºयांमध्ये विभागले गेले आहे. पेठ, सुरगाणा या दोन तालुक्यात आजही बºयापैकी सरासरीनजीक जाणारा पाऊस पडत असतो; याच तालुक्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या चांदवड, मालेगाव, नांदगाव तालुक्यात मात्र दुष्काळाचे सावट दिसून येत असते. त्यामुळे मांजरपाडापासून एकदºयापर्यंतच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून सदरचे पाणी दिंडोरी व कळवण तालुक्यातील वळण बंधाºयात टाकल्यास नाशिक जिल्ह्यातीत सर्वच दुष्काळी तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार असून, वर्षांनुवर्ष दुष्काळाच्या छायेत अडकून पडलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. यासाठी दुष्काळी तालुक्यातील जनतेने जागे होणे गरजेचे आहे.
पाण्यासाठी संघर्षाची भूमिका ठेवून शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झाली
आहे. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आंबेगणनजीक झारलीपाड्याच्या वळण बंधाºयाद्वारे वाघाड धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून वाघाड, पालखेडमार्गे येवला, चांदवड, नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांना सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे हेच पाणी गोदावरी खोºयात वळवून कश्यपी, गंगापूर धरणातून
सिन्नरमार्गे थेट जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
एकंदरीत एकदरे वळण प्रकल्पावर आगामी काळात स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघर्ष समिती यांना आपापल्या स्तरावर काम करण्याची गरज आहे. ( समाप्त )खासदारद्वयींची भूमिका महत्त्वाचीनाशिक जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून, नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे हेमंत गोडसे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण करीत आहेत. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आपापल्या मतदारसंघात वळविण्यासाठी दोन्ही खासदारांचे प्रयत्न सुरू राहणार असून, यामध्ये कोण बाजी मारेल याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिमवाहिनी प्रकल्प चर्चेला येणार आहेत. मागील आठवड्यात केंद्रीय जल आयोगाच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील एकदरे प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाची निर्मिती झाल्यास सदरचे पाणी वाघाड धरणात वळविण्यासाठी आग्रह धरला आहे.

Web Title: Who will get water of unity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी