...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:20 PM2017-11-19T23:20:39+5:302017-11-19T23:23:09+5:30

नाशिक : शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर जेव्हा ‘स्नॅप’ टाकला तेव्हा असे चित्र पहावयास मिळाले. एकूणच शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम आहे; मात्र याकडे संबंधित यंत्रणेकडून डोळेझाक केली जात आहे.

Who is this responsibility? The roads in the city have started breathing. Only ..... | ...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र .....

...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र .....

Next
ठळक मुद्देशहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम

नाशिक : शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर जेव्हा ‘स्नॅप’ टाकला तेव्हा असे चित्र पहावयास मिळाले. एकूणच शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम आहे; मात्र याकडे संबंधित यंत्रणेकडून डोळेझाक केली जात आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सदरचे काम शहर वाहतूक शाखेचे आहे, असे वाटते व वाहतूक शाखा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अंगुलीनिर्देश करते. मात्र या टोलवाटोलवीत रस्त्यांवरील अडथळा कायम आहे. रहदारीला रस्ता मोकळा असावा, या दृष्टिकोनातून थेट उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले. या आदेशावरून रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळा ही किती गंभीर समस्या आहे, हे सहज अधोरेखित होते; परंतु महापालिका किंवा शहर वाहतूक पोलीस यंत्रणेला अशा प्रकारचा अडथळा वाटत नसावा, म्हणूनच की काय, कोणीही कारवाईसाठी पुढे धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळे करून दिले जावे, एवढीच माफक अपेक्षा नाशिककर संबंधित यंत्रणेकडून क रत आहे. किमान यासाठी तरी न्यायालयीन आदेशाची प्रतीक्षा न करता आपली
जबाबदारी ओळखून धडक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title: Who is this responsibility? The roads in the city have started breathing. Only .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.