तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 06:26 PM2019-07-19T18:26:21+5:302019-07-19T18:26:51+5:30

सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या कार्यालयात विराजमान झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांची तर भलतीच त्रेधातिरपीट उडाली.

When 'Yamraaj' comes in Talegaon Ashramshala ..! | तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..!

तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..!

Next
ठळक मुद्देवाहतूक नियमांची जनजागृती : वाहन सुरक्षित चालविण्याचे आवाहन

घोटी : सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या कार्यालयात विराजमान झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांची तर भलतीच त्रेधातिरपीट उडाली. मुलांची त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी उडाली.
यमराज? आणि तेही शाळेत? गोंधळलात ना? साहजिकच आहे. शाळेत आलेले हे यमराज खरेखुरे यमराज नव्हते हो! ते होते सेवानिवृत्त अभियंता मिलिंद पगारे. प्लॅस्टिक प्रदूषणाची भीषण समस्या आणि त्यावर उपाय यावर त्यांनी अभ्यास केला आहे. या विषयावर ते कृतियुक्त व्याख्यानेही देतात.
संजीवनी आश्रमशाळेत ते ‘यमराज’ बनून आले होते ते ट्रॅफिक नियमांचं पालन करा हे सांगण्यासाठी! त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर लोकांना हल्ली कसलीच भीती वाटेनाशी झालीय, अगदी यमाचीसुद्धा! लोकांनी यम पाहिलेला नसतो, पण तुमच्या बेदरकार वाहने चालविण्यामुळे तो कधीही तुमची भेट घेऊ शकतो, निदान त्याला घाबरून तरी रस्त्यावर रहदारीचे नियम पाळा आणि सुरक्षित वाहन चालवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नि:स्वार्थ भावनेने शाळेला भेटी देत जनजागृती करत आहे. सेवानिवृत्त माणसे म्हटले की निवांतपणाकडे सगळ्यांचा कल असतो; पण मिलिंद पगारे यांनी मात्र पर्यावरण जनजागृती, प्लॅस्टिक प्रदूषण, रहदारीचे नियम या सगळ्या गोष्टींमध्ये स्वत:ला अगदी वाहून घेत निवृत्तीनंतरची ‘सेकंड इनिंग’ सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांना धडे
रस्त्यावर, महामार्गावर, शाळा-कॉलेज या ठिकाणी जाऊन जमेल तशी जनजागृती ते करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम समजावेत, वाहन चालवताना काय खबरदारी घ्यावी यासाठी आपण काय काय करू शकतो, याची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. लोकांना फरक पडेल न पडेल याचा विचार न करता ते अविरतपणे आणि मुख्य म्हणजे नि:स्वार्थीपणे जनजागृती करत फिरत आहेत.

Web Title: When 'Yamraaj' comes in Talegaon Ashramshala ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.