बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:09 PM2019-06-15T22:09:18+5:302019-06-16T01:01:34+5:30

चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेली. दोन महिन्यांच्या बछड्यांना आपली आई परत मिळाली.

When he saw the calves his motherhood! | बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

Next
ठळक मुद्देबिबट्याची मादी रात्रीच पिलांना घेऊन गेली वनविभागाच्या मोहिमेला यश

बाजीराव कमानकर । लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेली. दोन महिन्यांच्या बछड्यांना आपली आई परत मिळाली.
चितेगाव शिवारात विहिरीत बिबट्याचे दोन बछडे रात्री आईच्या शोधात भटकत असताना अचानक गाढवे यांच्या विहिरीत पडली. सकाळी विहिरीतून आवाज येत असल्याचे किरण गाढवे यांच्या लक्षात आले. विहिरीत डोकावून पाहिले असता दोन बछडे त्यांना दिसली. त्यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागाचे अधिकारी संजय भंडारे यांना कळविले. भंडारे यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पिंजºयाच्या साहाय्याने बछड्यांना विहिरीच्या बाहेर काढले. बछडे अवघे दोन महिन्यांचे असल्याने त्यांना आईच्या दुधाची गरज होती. शिवाय इतक्या कमी वयाच्या बछड्यांना आईच्या कुशीची गरज असते म्हणून भंडारे यांनी निफाड येथील नर्सरीत आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्यांना तपासून दिले. कोणतीही जखम नसल्याचे सांगितले. मात्र आईच्या कुशीत आणि दुधाची आवश्यकता असल्याने पुन्हा चितेगाव येथील नागरिक, वनविभागाचे अधिकारी यांच्या संगमताने आई बछड्यांची भेट घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी बछड्यांना ज्या विहिरीतून बाहेर काढले होते, तेथे आणून ठेवले. ममत्व केवळ माणसात रहाते, असं नाही तर जीव सृष्टीच्या प्रत्येक मादीमध्ये आईचे ममत्व जागृत होते. आई मुलांची भेट झाल्याचे अनेक ठिकाणी ऐकले असले तरी आज मात्र पशुमध्येदेखील आई, लेकरांची माया अपवाद नाही.

Web Title: When he saw the calves his motherhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.